कर्नाटकातील मुलींच्या तस्करीला ‘ब्रेक’! वेश्या व्यवसायातून केले मुक्त

सांगली; सचिन लाड : मुलगी झाली की पेढे वाटप… आयुष्याची भाकरी झाली… असा विचार करून मुलीला वयाच्या 14 व्या वर्षीच वेश्या व्यवसायात ढकलण्याची कर्नाटकातील काही भागातील परंपरा… ती मोडीत काढण्यासाठी मुलींसाठी अनेक शासकीय योजना राबविल्याने सांगली, मिरजेत वेश्या व्यवसायासाठी मुलींच्या होणार्‍या तस्करीला ‘ब्रेक’ बसला. ही एक चांगली बातमी. ‘देवदासी’चा शिक्का! अल्पवयात ‘देवदासी’चा शिक्का बसलेल्या अनेक … The post कर्नाटकातील मुलींच्या तस्करीला ‘ब्रेक’! वेश्या व्यवसायातून केले मुक्त appeared first on पुढारी.

कर्नाटकातील मुलींच्या तस्करीला ‘ब्रेक’! वेश्या व्यवसायातून केले मुक्त

सांगली; सचिन लाड : मुलगी झाली की पेढे वाटप… आयुष्याची भाकरी झाली… असा विचार करून मुलीला वयाच्या 14 व्या वर्षीच वेश्या व्यवसायात ढकलण्याची कर्नाटकातील काही भागातील परंपरा… ती मोडीत काढण्यासाठी मुलींसाठी अनेक शासकीय योजना राबविल्याने सांगली, मिरजेत वेश्या व्यवसायासाठी मुलींच्या होणार्‍या तस्करीला ‘ब्रेक’ बसला. ही एक चांगली बातमी.
‘देवदासी’चा शिक्का!
अल्पवयात ‘देवदासी’चा शिक्का बसलेल्या अनेक मुली वर्षानुवर्षे सांगलीतील गोकुळनगर व प्रेमनगर या वस्तीत वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्या जात असत. त्यासाठी दलालांची मोठी टोळीच सक्रिय होती. कर्नाटकातील जमखंडी, अथणी, बागलकोट, विजापूर, रबकवीबनहट्टी, चिकोडी व बेळगावमधील पूर्व उत्तर भागातील अनेक कुटुंबे मागास. घरची स्थिती अत्यंत गरिबीची. उदरनिर्वाहासह करायचा कसा? असा त्यांच्यासमोर प्रश्न. मुलांना दोन वेळच पोटभर अन्नही घालता येत नाही, अशी त्यांची स्थिती.
देहविक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह
कर्नाटकातील गरीब कुटुंबांच्या संपर्कात दलाल गेले. स्थिती सुधारण्यासाठी मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. मुलींच्या आई-वडिलांनीही उदरनिर्वाह चालावा, यासाठी मुलींना या व्यवसायात ढकलले. मुलगी झाली की पेढे वाटप करून आंदोत्सव साजरा केला जात असे. मुलगी वयात आली की, तिची रवानगी सांगलीत वेश्या वस्तीत केली जायची. या मुलींचा सांभाळ करण्यासाठी कर्नाटकातील महिला असायच्या.
तस्करीला लागला ‘ब्रेक’!
मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. योजनांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाच्या स्थितीमध्ये सुधारणा झाली. त्यामुळे मुलींची वेश्या व्यवसायासाठी होणार्‍या तस्करीला ‘ब्रेक’ बसला. काही वर्षातच हा बदला झाला. सध्या कर्नाटकातील पाच टक्के मुली हा व्यवसाय करीत आहेत.
नेपाळ, बंगालमधील मुली
कर्नाटकातील मुलींची तस्करी थांबल्याने सध्या गोकुळनगर व प्रेमनगरमध्ये पश्चिम बंगाल व नेपाळमधील मुली वेश्या व्यवसाय करतात. गोकुळनगरात अडीचशे ते तीनशे महिला व मुली आहेत. प्रेमनगरमध्ये शंभरावर महिला व मुली आहेत. काहींजणी दलालांच्या माध्यमातून येथे आल्या आहेत. काही महिला-मुली चायनीज व्यवसायाच्या निमित्ताने कुटुंबियासोबत आल्या.
मुली, महिला प्रशिक्षकण : दीपक चव्हाण
सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण म्हणाले, महिला, मुलींना वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले जात आहे. स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी त्यांना शिवणक्लास व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले जात आहे. वाहन चालविण्याचे प्रशिक्षणही देण्याचा विचार सुरू आहे.

Latest Marathi News कर्नाटकातील मुलींच्या तस्करीला ‘ब्रेक’! वेश्या व्यवसायातून केले मुक्त Brought to You By : Bharat Live News Media.