मराठी भाषा विभागाच्या समितीवर ज्ञानेश्वर मुळे, नहार यांची नियुक्ती
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने एक समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची, तर सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. बुधवारी (दि. 14) मराठी भाषा विभागाने याबाबतचा सरकारी आदेश काढला. या समितीचे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित हेही सदस्य असतील.
केंद्र सरकारला संशोधन आणि अभ्यास करून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती 10 जानेवारी 2012 रोजी गठित केली. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मराठी भाषा विभागाने ही समिती गठित केली असून, त्यावर मुळे आणि नहार यांची नियुक्ती केली. या समितीतील पदाधिकार्यांनी महिन्यातून एकदा दिल्ली येथे केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडे आणि वरिष्ठ स्तरावर संपर्क करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबत पाठपुरावा करावा, असे आदेशात नमूद केले आहे.
हेही वाचा
सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षा आजपासून..
सीबीएसईच्या दहावी-बारावीची परीक्षा आजपासून..
शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान?
Latest Marathi News मराठी भाषा विभागाच्या समितीवर ज्ञानेश्वर मुळे, नहार यांची नियुक्ती Brought to You By : Bharat Live News Media.