जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; नारायण राणे यांची एकेरी भाषेत टीका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटीत 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी बुधवारी जोरदार टीका केली. त्यांचा एकेरीत उल्लेख केला. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जरांगे समर्थक यामुळे राणेंविरुद्ध आक्रमक … The post जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; नारायण राणे यांची एकेरी भाषेत टीका appeared first on पुढारी.

जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; नारायण राणे यांची एकेरी भाषेत टीका

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटीत 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी बुधवारी जोरदार टीका केली. त्यांचा एकेरीत उल्लेख केला. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. जरांगे समर्थक यामुळे राणेंविरुद्ध आक्रमक होऊ शकतात. (Narayan Rane)
जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर राणे यांनी एक्स पोस्टद्वारे ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे ते आता काहीही बडबड करीत आहेत. त्यांना मी मराठ्यांचा नेता मानत नाही, असे राणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Narayan Rane)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी बेताल बडबड जरांगे यांनी केली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरून हलून दाखव, असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असेही राणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Latest Marathi News जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे; नारायण राणे यांची एकेरी भाषेत टीका Brought to You By : Bharat Live News Media.