अहमदपूरच्या मुख्याधिकारीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यावर पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई
अहमदपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : अहमदपूरचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर रचनाकारास पाच लाखांची लाच घेताना बुधवारी (दि. १४) सायंकाळी पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे (39, अहमदपूर) आणि नगर रचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे (55, लातूर) अशी त्यांची नावे आहेत. मरशिवणी येथील जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असताना अंतिम परवानगी मिळण्याकरिता नगर परिषदेकडे अर्ज दाखल करीत ऑनलाइन चालन भरले होते. या कामासाठी सात लाखांची मागाणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती. या मागणीची पडताळणी बुधवारी (दि. 14) पंचासमक्ष करीत पाच लाखांवर तडजोड झाली. ही रक्कम कस्तुरे यांनी आपल्या कारमध्ये स्विकारली. त्यानंतर दोघांनाही पथकाने पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अहमदपूर पोलिस ठाण्यात सुरू होती.
Latest Marathi News अहमदपूरच्या मुख्याधिकारीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यावर पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.