कोल्हापूर : नरतवडे येथे शाॅर्टसर्कीटने दीड एकरातील ऊस जळून खाक

सरवडे; Bharat Live News Media वृत्तसेवा : नरतवडे ( ता.राधानगरी ) नदीकाठच्या जॅकवेल शेतात भर दुपारी तीनच्या दरम्यान अचानक शाॅर्टसर्कीटने शेतातील तोडणीला आलेल्या ऊसाच्या फडाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत चार शेतकऱ्यांचा दीड एकरावरील ऊस जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, नदीकाठच्या जॅकवेल नावाच्या शेतात दुपारी तीनच्या दरम्यान शाॅर्टसर्कीटने अचानक उसाला आग लागली. ही माहीती मिळताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी शेतात धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. तोडणीस आलेला व वाळलेल्या पाल्याने ऊस जळून त्याची चिपाडं बनली. उभा ऊस जळत असताना पाहून दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. दरवर्षी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेला ऊस जळून शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी भरारी वीज मंडळाने भरारी पथक नेमणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ व बिद्रीच्या अग्निशमन बंबाने शर्थीचे प्रयत्न केले.
यामध्ये वासुदेव पाटील, अनिकेत पाटील, बाळासो रामाणे व युवराज मगदूम या शेतकऱ्यांचा दीड एकरावरील ऊस जळून लाखोंचे नुकसान झाले असून शासनाने त्याचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.. भर दिवसा दुपारी हे अग्नी तांडव झाल्यामुळे आगीचा भडका थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. मात्र आगीच्या लोटांमुळे प्रयत्न कमी पडले- अग्निच्या ज्वाला व धूर मोठ्या प्रमाणात होता, त्यास मोकळ्या वाऱ्याची साथ मिळाल्याने आग आटोक्यात येत नव्हती.
Latest Marathi News कोल्हापूर : नरतवडे येथे शाॅर्टसर्कीटने दीड एकरातील ऊस जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.
