परभणी : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जिंतूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ शहरातील सकल मराठा समाजाने आज (दि.१४) नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. सायंकाळी ५ च्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणादरम्यान जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी जरांगे-पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचा निषेध व्यक्त करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत आंदोलन केले. यावेळी नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून पुतळा जाळण्यात आला.
हेही वाचा :
सांगली : दिवंगत आमदार बाबर यांनी अखेरच्या क्षणी पाठपुरावा केलेली कामे मंजूर
Nashik News : माळेगाव एमआयडीसीत पडीक जागेत वनवा पेटला, आजुबाजुच्या कंपन्यांना धोका
मालेगावात मोठी कारवाई! पावणेचार कोटींची रंग लावलेली भेसळयुक्त सुपारी जप्त
Latest Marathi News परभणी : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन Brought to You By : Bharat Live News Media.
