धुळे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

धुळे : पुढारी  वृत्तसेवा- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालय अधिनस्त धुळे जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित, व कायम स्वरुपी विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृहामधील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाल्याची माहीती जिल्हा परिषदेचे … The post धुळे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा appeared first on पुढारी.

धुळे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा

धुळे : Bharat Live News Media  वृत्तसेवा- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालय अधिनस्त धुळे जिल्हयातील अनुदानित, विना अनुदानित, व कायम स्वरुपी विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा व मतिमंद बालगृहामधील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा जिल्हा क्रिडा संकुल येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली आज संपन्न झाल्याची माहीती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज  कल्याण अधिकारी  मनिष पवार यांनी दिली आहे.
स्पर्धेचे उद्धाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेद्र पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती कैलास पावरा, जि.प.सदस्य बादल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी जिल्हयातील २२ अनुदानित, विना अनुदानित दिव्यांग शाळा, कार्यशाळा, व अनाथ मतिमंद बालगृहातील ५०० विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २२६ स्पर्धक वयोगटानुसार व दिव्यांगाच्या प्रकारानुसार विविध २८ प्रकारच्या मैदानी क्रिडा स्पर्धेत सहभाग नोंदविला. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यात संबंधीत शाळेचे १५० शिक्षक व शिक्षकेत्तर व सहाय्यक कर्मचारी व मुख्याध्यापक उपस्थित होते.
मैदानी खेळ क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेवून प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पदक प्रदान करण्यात आले. क्रीडा स्पर्धेची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
Latest Marathi News धुळे : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा Brought to You By : Bharat Live News Media.