माळेगाव एमआयडीसीत पडीक जागेत वनवा पेटला

सिन्नर : Bharat Live News Media वृत्तसेवा- सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीत वडझिरे घाटाच्या बाजूला दोन ते तीन एकर क्षेत्रावर पडीक जागेत वनवा पेटला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते.
एमआयडीसीचा अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग वेळीच आटोक्यात न आल्यास आजूबाजूच्या कंपन्यांनाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :
Deepak Kesarkar : राज्यातील शाळेत नॉनटिचिंग ‘हॅपी सॅटर्डे’ संकल्पना राबवणार: दीपक केसरकर
Lagna Kallol : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या लग्नाचा कल्लोळ
Latest Marathi News माळेगाव एमआयडीसीत पडीक जागेत वनवा पेटला Brought to You By : Bharat Live News Media.
