अरब अमिरातमध्ये हिंदू मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यूएईची (संयुक्त अरब अमिरात) राजधानी अबुधाबीलगत या मुस्लिम देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून दोन दिवसांच्या यूएई (संयुक्त अरब अमिरात) दौऱ्यावर होते. (UAE Hindu Mandir)
UAE Hindu Mandir : यूएईचे भारतासाठी महत्त्व
यूएई भारताचा तिसरा सर्वात मोठा भागीदार देश आहे. ६ लाख कोटींहून अधिक रुपयांची आयात-निर्यात भारत-यूएईमध्ये होते; २ लाख कोटी रुपयांची आयात भारतातून यूएईत होते तर ४ लाख कोटी रुपयांची निर्यात यूएईतून भारतात होते. यूएईमध्ये एकूणलोकसंख्येच्या ३० टक्के मूळ भारतीय आहेत. ३५ लाखांच्या जवळपास मूळ भारतीय या देशात राहतात. रशिया, सौदी अरेबिया आणि इराकनंतर यूएई हा भारताला तेलपुरवठा करणारा चौथा मोठा देश आहे.
दृष्टिक्षेपात मंदिर
17 एकर जमीन २०१५ मधील पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात यूएई अध्यक्षांकडून हिंदू मंदिरासाठी दान
2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी
700 कोटी रुपये मंदिरावर करण्यात आलेला एकूण खर्च
10 हजार लोक एकाचवेळी पूजापाठ करू शकतील
7 शिखरे अरब अमिरातमधील 7 प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात. मंदिरात जगन्नाथ, कार्तिकेश्वर आदींच्या मूर्ती
4 ग्रंथांतील (रामायण, महाभारत, भागवत आणि शिवपुराण) प्रसंगांवर आधारित शिल्पे
1,100 अक्षरधाम मंदिरे जगभरात
दुश्मन ते जानी दोस्त भारत-यूएई संबंधांचा प्रवास
दुश्मन ते जानी दोस्त भारत-यूएई संबंधांचा प्रवास
१९९९ हरकत-उल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी काठमांडूहून दिल्लीला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान हायजॅक केले. अमृतसरहून लाहोर आणि नंतर यूएई एअरबेसमार्गे अफगाणिस्तानातील कंदहारला हे विमान नेण्यात आले होते. भारताचे नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो या विमानाच्या मागावर होते. यूएईमधील अल-मिनहाद एअरबेसवर इंधनासाठी अपहृत विमान उतरले. एनएसजी कमांडोंनी यूएईकडून दहशतवादविरोधी ऑपरेशनसाठी परवानगी मागितली; पण नकार मिळाला. या घटनेतून यूएई आणि भारत संबंध तेव्हा कसे होते, हे समोर येते.
२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा यूएईला भेट दिली आणि तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सातत्याने सुधारत गेले. यूएईने पाकिस्तानला आर्थिक संकटात मदत जरूर केली; पण काश्मीरबाबत भारताविरोधात आजतागायत कोणतेही वक्तव्य केले नाही.
२०१६ च्या उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला यूएईने पाठिंबा दिला.
२०१९ भारताने काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द केले, तेव्हा यूएईने हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे मत नोंदविले.
२०१९ बालाकोट एअर स्ट्राईकलाही यूएईने पाठिंबा दिला.
२०१९ यूएई सरकारने तेथील सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायेद’ देऊन पंतप्रधान मोदींना सन्मानित केले.
२०२३ यूएईचे उपपंतप्रधान सैफ बिन झायेद अल नाहयान भारत- मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरबाबत शेअर केलेल्या नकाशात पीओके हा भाग भारतामध्ये दाखवून पाकिस्तानात मोठी खळबळ उडवून दिली. लगोलग पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी यूएईकडे मदत मागितली होती.
२०२४ यूएई या इस्लामिक देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य हिंदू मंदिराचे उद्घाटन होत आहे.
हेही वाचा
Farmers Protest Delhi : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत बंदोबस्त वाढला, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद
AUS vs WI : विंडीजचा कांगारूंना धक्का; तिसर्या टी-20 सामन्यातऑस्ट्रेलिया 37 धावांनी पराभूत
Latest Marathi News अरब अमिरातमध्ये हिंदू मंदिराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन Brought to You By : Bharat Live News Media.