अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे घोषीत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिलेल्या माहितीनंतर अजित पवार गटाकडून हे नाव समोर आले आहे.
आज (दि. १४) भाजपच्या राज्यसभासाठी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपनंतर महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव आता समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून अनेक नेत्यांची राज्यसभेसाठी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. यामध्ये नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले बाबा सिद्दकी आणि पार्थ पवार यांचे नाव चर्चेत होते. मात्र आज सायंकाळी उशीरा सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे पटेल हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. ते राजीनामा देऊन पुन्हा राज्यसभेसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे.
Latest Marathi News अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी Brought to You By : Bharat Live News Media.
