अजित गोपछडे ठरले भाजपचे जायंट किलर; ‘या’ कारणांमुळे लागला राज्यसभेचा जॅकपॉट

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड मधील संघ परिवारातील कार्यकर्ते अशी सर्वदूर ओळख असणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित माधवराव गोपछडे यांना राज्यसभा उमेदवारी मिळाली आहे. अचानकपणे भाजपकडून हे नविन नाव समोर आले. त्यामुळे गोपछडे यांना राज्यसभेची लॉटरी लागली अशी चर्चा परिसरात आहे. चार वर्षांपूर्वी गोपछडे यांचे ऐनवेळी विधानपरिषद उमेदवारीचे तिकीट कापण्यात आले होते. सध्याच्या राज्यसभा … The post अजित गोपछडे ठरले भाजपचे जायंट किलर; ‘या’ कारणांमुळे लागला राज्यसभेचा जॅकपॉट appeared first on पुढारी.
अजित गोपछडे ठरले भाजपचे जायंट किलर; ‘या’ कारणांमुळे लागला राज्यसभेचा जॅकपॉट

अमृत देशमुख

नांदेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : नांदेड मधील संघ परिवारातील कार्यकर्ते अशी सर्वदूर ओळख असणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित माधवराव गोपछडे यांना राज्यसभा उमेदवारी मिळाली आहे. अचानकपणे भाजपकडून हे नविन नाव समोर आले. त्यामुळे गोपछडे यांना राज्यसभेची लॉटरी लागली अशी चर्चा परिसरात आहे.
चार वर्षांपूर्वी गोपछडे यांचे ऐनवेळी विधानपरिषद उमेदवारीचे तिकीट कापण्यात आले होते. सध्याच्या राज्यसभा तिकिटामुळे या जुन्या प्रसंगाला उजाळा मिळाला आहे. भाजपमधील प्रभावशाली लिंगायत चेहरा म्हणून डॉ.गोपछडे यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लिंगायत समाजाला खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला आहे. डॉ.गोपछडे यांच्यासारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केली.
डॉ.गोपछडे यांना उमेदवारी जाहीर होताच बिलोली, देगलूर तालुक्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. १३) भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
चव्हाण यांचे नाव राज्यसभेसाठी फायनल असल्याचे सांगण्यात आले होते. आज (दि.14) भाजपचे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरूणसिंह यांनी गुजरात व महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीत अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश होता, त्याचबरोबर अचानकपणे डॉ. अजित गोपछडे यांचे नावही तिसऱ्या नंबरवर झळकले त्यामुळे अनेकांना सुखद धक्का बसला.
2020 मध्ये गोपछडे यांना अंतर्गत राजकारणाचा फटका
भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जातीय समीकरणाचा सारासार विचार करून नांदेडला एकाचवेळी दोन खासदार देत झुकते माप दिले आहे. मे 2020 मध्ये भाजपने डॉ. गोपछडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली होती. ऐनवेळी अंतर्गत राजकारणाचा फटका डॉ. गोपछडे यांना बसला व त्यांची उमेदवारी कापली गेली. त्यांच्याजागी शेजारील लातूर जिल्ह्यातील रमेश कराड यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. ऐनवेळी डॉ. गोपछडे यांची उमेदवारी कापल्या गेल्यामुळे लिंगायत समाजात वेगळा संदेश जात पक्ष नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
गोपछडे यांचे पक्षासाठी उल्लेखनीय कार्य
विधानपरिषदेने हुलकावणी दिल्यानंतरही डॉ. गोपछडे यांनी नाराज न होता, पक्षकार्यास स्वत:ला वाहून घेतले होते. पक्षश्रेष्ठीने त्यांच्या वेदनेवर  फुंकर मारत विविध जबाबदारीचे औषधरूपी मलम लावून डॉ. गोपछडे यांना पक्षाशी कायम कनेक्ट ठेवले. त्यांच्यावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आली होती, भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक तसेच राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक चे संयोजक अशा जबाबदाऱ्याही त्यांनी समर्थपणे भूषविल्या आहेत. बीड, धाराशिव जिल्ह्यात लोकसभा समन्वयक तसेच लोकसभा प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले असून या दोन्ही जिल्ह्यात विविध बैठका घेवून भाजपचे संघटन मजबूत करण्याचे काम त्यांनी केले आहे. मागील वर्षी पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विकाराबाद जिल्ह्यातील पारगी विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निपाणी विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अनेक बड्या नेत्यांच्या सभांचे यशस्वी नियोजन करत डॉ. गोपछडे यांनी पक्ष श्रेष्ठींचा विश्वास संपादन केला होता. पक्षपातळीवर संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून डॉ. गोपछडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची नोंद अखेर पक्षश्रेष्ठीने घेतली असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
राज्यसभेवर त्यांची नियुक्ती आता जवळपास निश्चीत झाली असून गुरूवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपमधील एका निष्ठावंत पदाधिकाऱ्याला न्याय मिळाला, अशी भावना आ. राम पाटील रातोळीकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आ. रातोळीकरांनी दिल्या होत्या जॅकपाॅटच्या शुभेच्छा
मागील आठवड्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात जाहीरपणे आ. राम पाटील रातोळीकर यांनी डॉ. अजित गोपछडे  यांना डॉक्टरसाहेब तुम्हाला अचानकपणे जॅकपाॅट लागेल, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या होत्या. भाजपच सर्वांना न्याय देवू शकतो, असे यावेळी आ. रातोळीकर म्हणाले होते. आ. रातोळीकर यांचे शब्द खरे ठरले असून डॉ. गोपछडे यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. या प्रसंगाला आ. रातोळीकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उजाळा दिला.
Latest Marathi News अजित गोपछडे ठरले भाजपचे जायंट किलर; ‘या’ कारणांमुळे लागला राज्यसभेचा जॅकपॉट Brought to You By : Bharat Live News Media.