चिंचवारसाठी अक्कलपाडा डाव्या कालव्यातून पाणी द्यावे, जिल्हाधिकार्यांकडे मागणी

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- धुळे तालुक्यातील चिंचवार येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा डावा कालव्याचे पाणी नाथरीपाडाजवळील चिरक्यावड धरणात सोडण्यात यावे, अशी मागणी चिंचवार ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
चिंचवार गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी धुळे निवासी जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन पाणीटंचाई संदर्भातली माहिती त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समोर ठेवली. निवेदन दिले. चिंचवार ता.धुळे येथे आतापासूनच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावाची नळ पाणी पुरवठा योजना नाथरीपाडा जवळील चिरक्यावड धरणाच्या पायथ्याशी आहे. मात्र दुष्काळामुळे हे धरण कोरडेठाक पडले आहे. परिणामी पाणी योजनेच्या विहीरीची पाण्याची पातळी खालवली असून गावासाठी पिण्याचा पाणीपुरवठा अपूर्ण पडत आहे.
पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय…
दरम्यान चिंचवार गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी अन्यत्र कोणतेही पाण्याचे स्त्रोत नाहीत. त्यामुळे येथील माता बघिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच जनावरांनाही पाणी टंचाईची झळ बसली आहे. म्हणून अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात पाणी टाकल्यास नळ पाणी योजनेच्या विहीरीची पाण्याची पातळी वाढून चिंचवार गावाची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होवू शकते. म्हणून अक्कलपाडा डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच सोमनाथ पाटील,ग्रामपंचायत सदस्य दाजभाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य रहीम पटेल यांनी निवेदन दिले.
हेही वाचा :
छ.संभाजीनगर : ऊस न घालता रेणुकादेवी कारखान्याकडून २.७१ लाख उकळले; स्लीप बॉयसह २ जणांविरुद्ध गुन्हा
NCP MLA disqualification Verdict | मोठी बातमी! राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेवर उद्या निकाल
Shreyas Talpade-Gauri Ingawale : श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’?
Latest Marathi News चिंचवारसाठी अक्कलपाडा डाव्या कालव्यातून पाणी द्यावे, जिल्हाधिकार्यांकडे मागणी Brought to You By : Bharat Live News Media.
