छ.संभाजीनगर : बिडकीन येथे ब्लॅकमेलिंग करून विवाहितेवर अत्याचार; ५ जणांविरोधात गुन्हा

पैठण, Bharat Live News Media वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील बिडकीन येथे एका विवाहित महिलेला ब्लॅकमेलिंग करून पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पाच जणांनी सामूहिकपणे अत्याचार केला. याप्रकरणी बिडकिन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बिडकीन पोलीस ठाण्यात आज ( दि.१४) तक्रार दिली.
याबाबत माहिती अशी की, पैठण तालुक्यातील बिडकीन येथील एका २९ वर्षीय महिलेला ब्लॅकमेलिंग व पाठलाग करून पती व मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पाच जणांनी संगणमत करून दि.१० नोव्हेंबर २०२२ रोजी कृष्णापूर (ता.पैठण) येथील आरोपीच्या घरी अत्याचार केला. त्यानंतर दि.१० ऑगस्ट २०२३ रोजी पार्वती लॉजवर पुन्हा सामूहिक अत्याचार केला.
त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दीपक गरड, अरमान (दोघे रा. बिडकीन) व इतर ३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि जनाबाई सांगळे करीत आहेत.
हेही वाचा
छ.संभाजीनगर : ऊस न घालता रेणुकादेवी कारखान्याकडून २.७१ लाख उकळले; स्लीप बॉयसह २ जणांविरुद्ध गुन्हा
छ.संभाजीनगर: बसची दुचाकीला धडक; पैठण कारागृहाचा लिपिक ठार
छ.संभाजीनगर : गुंठेवारी नसलेल्या घरांवर बुलडोझर चालवणार: मनपा प्रशासकांचा इशारा
Latest Marathi News छ.संभाजीनगर : बिडकीन येथे ब्लॅकमेलिंग करून विवाहितेवर अत्याचार; ५ जणांविरोधात गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.
