Crime News : वृद्धेचा खून करून चोरी करणारे दाम्पत्य जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : मांजरवाडी हद्दीतील घणवटमळा येथील ७० वर्षीय महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे यांचा खून करून पळून गेलेल्या संशयितांना ४८ तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत (वय २१) व पूनम संकेत श्रीमंत (वय २०, दोघेही मूळ रा. गजानननगर चिखली, ता. … The post Crime News : वृद्धेचा खून करून चोरी करणारे दाम्पत्य जेरबंद appeared first on पुढारी.

Crime News : वृद्धेचा खून करून चोरी करणारे दाम्पत्य जेरबंद

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : मांजरवाडी हद्दीतील घणवटमळा येथील ७० वर्षीय महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे यांचा खून करून पळून गेलेल्या संशयितांना ४८ तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. शिवम ऊर्फ संकेत शाम श्रीमंत (वय २१) व पूनम संकेत श्रीमंत (वय २०, दोघेही मूळ रा. गजानननगर चिखली, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत दाम्पत्य खोडद येथे एका शेतकऱ्याकडे कामाला होते. तेथेच त्यांची सुलोचना टेमगिरे यांच्याशी ओळख झाला. दरम्यान, आम्हाला गावाला जायचे आहे असे सांगून ते जोडपे तेथून निघाले व मूळ मालकाकडे कामाला न जाता सुलोचनाबाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. याच वेळी या दाम्पत्याने या वृद्धेचा खून केला.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे अभिजित सावंत, दीपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्हा घडलेल्या परिसरात शेत मजुरीसाठी वाशिम जिल्ह्यातील एक जोडपे आले होते. ते जोडपे अचानक काही दिवसांपूर्वी निघून गेले. परंतु ते दाम्पत्य घटनेच्या दिवशी धनवटमळा परिसरात वावरताना दिसून आले होते. ही माहिती मिळताच पोलिस पथकाने संशयित जोडप्याची माहिती मिळवून स्थानिक गुन्हा शाखा पथक व नारायणगाव पोलिस यांना मदतीला घेऊन एक पथक वाशिम जिल्ह्यात पाठविले होते.
दरम्यान, संशयित दाम्पत्य हे अहमदनगर बसस्थानक परिसरात थांबलेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान श्रीमंत दाम्पत्याने सुलोचना टेमगिरे यांच्या राहत्या घरातून त्यांचा मोबाईल व सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून मयत सुलोचना टेमगिरे यांचा चोरी केलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. सुलोचना टेमगिरे या महिलेचा खून करणाऱ्या या जोडप्याने खोडद येथे ज्यांच्याकडे कामाला होते, तेथेही चोरी केली असल्याचे समजते.
Latest Marathi News Crime News : वृद्धेचा खून करून चोरी करणारे दाम्पत्य जेरबंद Brought to You By : Bharat Live News Media.