मालेगावात मोठी कारवाई! पावणेचार कोटींची भेसळयुक्त सुपारी जप्त

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाने मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वर्‍हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा येथे छापा टाकून रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे पाऊणेचार कोटीचा साठा जप्त केला आहे. कर्नाटकातून दिल्ली येथे अकरा ट्रकमधून छुप्या पद्धतीने या सुपारीची वाहतूक करण्यात येत होती. इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ व रंग लावलेली सुपारी मिळून … The post मालेगावात मोठी कारवाई! पावणेचार कोटींची भेसळयुक्त सुपारी जप्त appeared first on पुढारी.

मालेगावात मोठी कारवाई! पावणेचार कोटींची भेसळयुक्त सुपारी जप्त

मालेगाव(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा; अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाने मनमाड-मालेगाव रस्त्यावरील वर्‍हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा येथे छापा टाकून रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे पाऊणेचार कोटीचा साठा जप्त केला आहे. कर्नाटकातून दिल्ली येथे अकरा ट्रकमधून छुप्या पद्धतीने या सुपारीची वाहतूक करण्यात येत होती. इतक्या मोठ्या प्रमाणात भेसळ व रंग लावलेली सुपारी मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही सुपारी नेमकी कशासाठी वापरली जाते हा संशोधनाचा विषय आहे.
अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाने सोमवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. कर्नाटक राज्यातून दिल्ली येथे रंग लावलेल्या सुपारीची ट्रकमधून मनमाड – मालेगाव रस्त्यावरून अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे व सहकार्‍यांनी वर्‍हाणे शिवारातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व परिसरात शोध घेतला. त्यांना ढाब्याच्या पाठीमागे रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल 11 ट्रक छुप्या पद्धतीने लावलेले आढळून आले. पथकाने सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये कीटकांच्या प्राद्रुभावाने खराब झालेली व ते लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे 3 कोटी 84 लाख 19 हजार 983 रुपये किमतीचा 252 टन साठा मिळून आला.
11 नमुने विश्‍लेषणासाठी
यानंतर नाशिक कार्यालयाच्या पथकास पाचारण करण्यात आले. नाशिकचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुपारीचे एकूण 11 नमुने विश्‍लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. गुप्तवार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी दाभाडे अधिक तपास करीत आहेत. अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (दक्षता) राहुल खाडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील, दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, योगेश देशमुख, गोपाळ कासार, अमित रासकर, सुवर्णा महाजन, सायली पटवर्धन, नमूना सहाय्यक सचिन झुरडे आदींच्या पथकाने कारवाई केली.
हेही वाचा :

Hee Anokhee Gath Love Song : ‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज
अंतरवाली सराटी : गोदा पट्ट्यासह जिल्हा-परजिल्ह्यातील मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या भेटीला
Ratnagiri News : मेढे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Latest Marathi News मालेगावात मोठी कारवाई! पावणेचार कोटींची भेसळयुक्त सुपारी जप्त Brought to You By : Bharat Live News Media.