मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

नांदगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, या उपोषणास पाठिंबा देत. सकल मराठा समाज नांदगाव तालुका यांच्या वतीने देखील गेल्या पाच दिवसापासून नांदगाव जुने तहसील कार्यालय जवळ … The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू appeared first on पुढारी.

मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू

नांदगाव(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा – अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून, या उपोषणास पाठिंबा देत. सकल मराठा समाज नांदगाव तालुका यांच्या वतीने देखील गेल्या पाच दिवसापासून नांदगाव जुने तहसील कार्यालय जवळ बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
दिनांक 10 फेब्रुवारी पासून भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांच्या माध्यमातून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना जाहीर आवाहन केले की या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधानसभेच्या व विधान परिषदेच्या मराठा आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी मराठा समाज बांधवांनी आपापल्या तालुक्यातील विद्यमान आमदारांना फोन कॉल करून किंवा मेसेज पाठवून या अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यास भाग पाडावे तसेच या शेवटच्या अंतिम निकराच्या लढाईत मोठ्या संख्येने सामील होऊन हा लढा यशस्वी करावा असे आव्हान देखील समाज बांधवांना करण्यात आले आहे.
तसेच समाज बांधवांना या बेमुदत आमरण उपोषणात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
या उपोषणासाठी किरण जाधव, महेंद्र जाधव, विष्णू चव्हाण, गणेश काकळीज, ज्ञानेश्वर कवडे, सजन कवडे, विजय पाटील, निवृत्ती खालकर, गणेश सरोदे, भिमराज लोखंडे, निलेश चव्हाण आधी समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
हेही वाचा :

दिल्ली दंगल | उमर खालिदने स्वतःच जामीन अर्ज मागे घेतला; सुप्रिम कोर्टात दिले ‘हे’ कारण
दीर्घकाळच्या खरुजावर ‘हे’ आहेत आयुर्वेदोपचार

Latest Marathi News मराठा आरक्षणासाठी नांदगावी बेमुदत उपोषण सुरू Brought to You By : Bharat Live News Media.