गोदा पट्ट्यासह जिल्हा-परजिल्ह्यातील मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या भेटीला

वडीगोद्री : Bharat Live News Media वृत्तसेवा – अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्त निघाले तरी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. नाकातून रक्त निघल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आणि गोदा पट्ट्यासह जिल्हा परजिल्ह्यातील समाज बांधव जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अंतरवालीत येवू लागला.
संबंधित बातम्या –
हिंगोली – सेनगाव शहर बंदला यशस्वी प्रतिसाद
परभणी : सेलू शहर कडकडीत बंद; बाजारपेठेत शुकशुकाट
बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज उमापूर बंद
या गर्दीने वडीगोद्री ते अंतरवाली सराटी रस्ता दिवसभर जाम होता. वडीगोद्रीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. आज दिवसभर भेटीला येणाऱ्यांची संख्या वाढतच चाललेली आहे.
आज पाचव्या दिवशीही त्यांचं उपोषण सुटलेलं नाही. सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजवणी झाली पाहिजे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.
Latest Marathi News गोदा पट्ट्यासह जिल्हा-परजिल्ह्यातील मराठा बांधव मनोज जरांगे यांच्या भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.
