मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या लग्नाचा कल्लोळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या लग्नाचा कल्लोळ प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान या चित्रपटातील ‘झणझणल्या काळजा वरती’ हे झणझणीत गाणे तुम्ही पाहिले आहे का? (Lagna Kallol) मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे धमाकेदार गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे. जय अत्रे यांचे जबरदस्त बोल लाभलेल्या या गाण्याला प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांचे संगीत आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रिन्स याने केले आहे. (Lagna Kallol)
संबंधित बातम्या –
Shreyas Talpade-Gauri Ingawale : श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’?
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, किरण कोरे यांचं ‘घुंगराची चाळं’ गाणं पाहिलं का?
Shivrayancha Chhava : ‘शिवरायांचा छावा’मध्ये राहुल देव साकारणार नायब सुभेदार काकर खान
सिद्धार्थ जाधवचा एक वेगळाच लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर ‘लग्नकल्लोळ’चे दिग्दर्शन मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॅा. मयुर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे यांनी केले आहे. जितेंद्रकुमार परमार लिखित हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या गाण्याबद्दल डॅा. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ‘’ अतिशय एनर्जेटिक असे हे गाणे आहे. सिद्धार्थ जाधव, आदर्श शिंदे ही जोडी एकत्र आल्याने या गाण्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यात या गाण्याच्या शब्दांनी आणि संगीताने अधिकच भर टाकली आहे. सिद्घार्थ आणि मयुरीची अफलातून केमिस्ट्री या गाण्यातून दिसत आहे.’’
View this post on Instagram
A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)
Latest Marathi News मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या लग्नाचा कल्लोळ Brought to You By : Bharat Live News Media.
