दिल्ली दंगल | उमर खालिदने स्वतःच जामीन अर्ज मागे घेतला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील दंगलींचा कट रचल्याचा आरोप असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याने सुप्रिम कोर्टातील जामीन अर्ज स्वतःहून मागे घेतला आहे. उमर खालीद २०२०पासून तुरुंगात आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुप्रिम कोर्टातील सुनावणी १४ वेळा तहकुब झाली आहे. बुधवारी या प्रकरणावर सुप्रिम कोर्टात सुनावणी होती, पण खालिदचे वकील कपिल सिब्बल यांनी जामीन अर्ज मागे घेण्याबद्दल विनंती सादर केली, ती सुप्रिम कोर्टाने मान्य केली.
कपिल सिब्बल म्हणाले, “सध्या परिस्थिती बदलेली आहे. हे लक्षात घेता आम्ही सत्र न्यायालयात नव्याने आमचे नशिब आजमावू.”
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि पंकज मित्तल यांनी सिब्बल यांची विनंती मान्य केली.
Former Jawaharlal Nehru University (JNU) student Umar Khalid withdraws bail plea before Supreme Court in North-East Delhi riots in February 2020.
A bench of Justices Bela M Trivedi and Pankaj Mithal allows him to withdraw the bail plea.
(File photo) pic.twitter.com/EnsNER7m8H
— ANI (@ANI) February 14, 2024
दिल्लीत फेब्रुवारी २०२०ला दंगली झाल्या होत्या. यात ५३ लोकांचा बळी गेला तर ७०० लोक जखमी झाले. या प्रकरणात कट रचल्याचा आरोपावरून उमर खालिदला अटक करण्यात आली. जिल्हा न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर उमर खालीदने १८ ऑक्टोबर २०२२ला सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. उमर खालीदवर Unlawful Activities (Prevention) Act नुसार गुन्हा नोंद आहे.
हेही वाचा
जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदला जामीन देण्यास न्यायालयाचा स्पष्ट नकार
Bail applications – जामीन अर्जावर १० मिनिटांच्या वर सुनावणी नको : सर्वोच्च न्यायालय
उमर खालीद : CAA/NRC विरोधातील आंदोलन प्रथमदर्शनी ‘दहशतवादी’ कृत्य – दिल्ली उच्च न्यायालय
Latest Marathi News दिल्ली दंगल | उमर खालिदने स्वतःच जामीन अर्ज मागे घेतला Brought to You By : Bharat Live News Media.
