हिंगोली – सेनगाव शहर बंदला यशस्वी प्रतिसाद

सेनगाव (हिंगोली) – Bharat Live News Media वृत्तसेवा- सकल मराठा समाजाने दिनांक १४ रोजी सेनगाव बंद ची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आज सेनगावयेथे मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला समर्थन म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान सेनगाव येथे सकाळपासूनच सर्वच व्यापारी वर्गाने सहकार्य करत आपले दुकाने बंद ठेवली. दोन्ही बाजार समित्यां बंद ठेवून मराठा समाजाच्या या बंदला आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान आज आठवडी बाजार असूनसुद्धा सेनगाव येथे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. हॉटेल टपऱ्या चालक यांनी सुद्धा बंदमध्ये सहभाग घेत आपली दुकाने, हॉटेल्स बंद ठेवली.
संबंधित बातम्या –
धाराशिव: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी उमरगा तालुक्यात कडकडीत बंद
हिंगोली : औंढा नागनाथ तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा आरक्षण : सिल्लोड शहरात व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद; रस्ते निर्मनुष्य
या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनीही गावातील चौकाचौकात कडक बंदोबस्त ठेवला. दरम्यान या बंदला सेनगाव येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सेनगाव येथे आठवडी बाजार असल्यामुळे फक्त शेतकऱ्यांना भाजीपाल्याची दुकान उघडण्यास परवानगी दिली होती.
Latest Marathi News हिंगोली – सेनगाव शहर बंदला यशस्वी प्रतिसाद Brought to You By : Bharat Live News Media.
