बळजबरीने सलाईन लावल्याने मनोज जरांगेंनी सहकाऱ्यांना झापले

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा: मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचाराचा त्याग केला. मात्र आज सकाळपासून त्यांची तब्बेत खालावली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला होता. तरीही ते उपचार घ्यायला तयार नव्हते. अखेर बीड जिल्ह्यातील नारायणगड संस्थानचे महंत मठाधिपती शिवाजी महाराज हे उपोषणस्थळी आले आणि त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. Manoj Jarange Patil
तरीही जरांगे ऐकायला तयार नव्हते. अखेर शिवाजी महाराज यांनी जरांगे यांच्यावर नियमित उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सूचना करत बळजबरीने सलाईन लावण्याचे सांगितले. त्यानंतर जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे हात पाय पकडले आणि डॉक्टरांनी जरांगे यांना अखेर सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू केले. Manoj Jarange Patil
मी झोपेत असताना मला ज्यांनी बळजबरीने सलाईन लावली, त्यांनी सरकारच्या छाताडावर बसून अध्यादेशाच्या अंमलबावणीबाबत विचारायला पाहिजे होते. तसे न करता त्यांनी मला सलाईन लावली, ही त्यांनी मोठी चूक केली. आता सरकार म्हणेल, की यांचे लोक मला मरू देत नाही. मग आपल्या सोईने अंमलबजावणी करू. सलाईन लावणाऱ्या सगळ्यांनी आता सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाचा अंमलबजावणीची जबाबदारी घ्यावी. तुम्ही सरकारला वेठीस धरून अंमलबजावणी करून घ्या. तुम्हाला सलाईन लावायचा शहाणपणा करायला कुणी सांगितले असे म्हणत मनोज जरांगे यांनी सहकाऱ्यांना झापले.
अंमलबजावणी केली नाहीतर मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारात जाऊन बसणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू
Manoj Jarange Patil vs Narayan Rane | ‘मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय!’, नारायण राणेंची जीभ घसरली
Manoj Jarange Patil : जरांगेंची प्रकृती खालावली; अंतरवालीत वातावरण भावूक
Latest Marathi News बळजबरीने सलाईन लावल्याने मनोज जरांगेंनी सहकाऱ्यांना झापले Brought to You By : Bharat Live News Media.
