‘माळेगाव’च्या वाहतूकदारांना मिळणार प्रतिटन 25 रुपये अनुदान

शिवनगर : पुढारी वृत्तसेवा :  6 ते 50 किलोमीटर दरम्यानच्या ऊस वाहतुकीला 25 रुपये प्रतिटन अनुदान देण्याचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत मान्य केले आहे. जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांची कोंडी यामुळे ’माळेगाव’ने फोडली आहे. कारखाना वहातूकदारांची संघटना श्री नीलकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार संघटनेने कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी … The post ‘माळेगाव’च्या वाहतूकदारांना मिळणार प्रतिटन 25 रुपये अनुदान appeared first on पुढारी.

‘माळेगाव’च्या वाहतूकदारांना मिळणार प्रतिटन 25 रुपये अनुदान

शिवनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  6 ते 50 किलोमीटर दरम्यानच्या ऊस वाहतुकीला 25 रुपये प्रतिटन अनुदान देण्याचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सोमवारी (दि. 12) झालेल्या बैठकीत मान्य केले आहे. जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांची कोंडी यामुळे ’माळेगाव’ने फोडली आहे. कारखाना वहातूकदारांची संघटना श्री नीलकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूकदार संघटनेने कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे दर वाढविण्याची मागणी केली होती. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. केशवबापू जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, संचालक बन्सीलाल आटोळे, संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे, उपाध्यक्ष सागर तावरे, संजय खलाटे, बापूराव देवकाते, नितीन चोपडे, सचिन मोटे, गणेश जगताप, प्रवीण देवकाते, सुनीलकाका गावडे आदी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2023-24 चा गळीत हंगाम दुष्काळी परिस्थितीचा असल्याने उसाची कमतरता होती, तरीही वाहतूकदारांनी शर्थीचे प्रयत्न करून माळेगाव कारखान्यास ऊस पुरवठा करण्यास प्राधान्य दिले. तथापि यामधून ऊस वाहतूकदारांना दोन पैसे मिळाले पाहिजेत व अन्य मागण्यांसंदर्भात कारखाना प्रशासनाला निवेदने दिली होती. त्यामध्ये श्री नीलकंठेश्वर ट्रक-ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटना व कारखाना प्रशासन यांच्यामध्ये वेळोवेळी चर्चाही झाली.
माळेगाव कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूकदारास अनुदान स्वरूपामध्ये 6 ते 50 किलोमीटरमधील प्रतिटनास 25 रुपये, 51 ते 100 किलोमीटरपर्यंत 10 रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी यांना वाहतुकीचा स्लॅब हा 1 ते 8 किलोमीटरचा केला आहे. या वेळी संघटनेच्या सर्व वाहतूकदारांनी कारखाना अध्यक्ष अ‍ॅड. केशवबापू जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ चंद्रराव तावरे, बाळासाहेब तावरे, रंजनकाका तावरे, मदननाना देवकाते, योगेश जगताप, नितीन सातव तसेच सर्व संचालक मंडळाचे आभार मानले.
Latest Marathi News ‘माळेगाव’च्या वाहतूकदारांना मिळणार प्रतिटन 25 रुपये अनुदान Brought to You By : Bharat Live News Media.