परभणी : सेलू शहर कडकडीत बंद; बाजारपेठेत शुकशुकाट

सेलू : Bharat Live News Media वृत्तसेवा – बुधवारी शहरातील बाजारपेठ सकाळपासून कडकडीत बंद करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर देखील या बंदचा परिणाम झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १४ फेब्रुवारी रोजी हा बंद पाळण्यात आला होता.
संबंधित बातम्या –
Mumbai News : शार्कच्या हल्याची महाराष्ट्रातील पहिली घटना; तरूणाच्या पायाचा लचका तोडला, ‘या’ शहरातील थरार
जळगाव : निम्न तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यासाठी लागणाऱ्या वन जमीनीसाठी मान्यता अंतिम टप्यात
Rajya Sabha election 2024 : राज्यसभेच्या उमेदवारीतून भाजपने साधले ‘सोशल इंजिनिअरिंग’
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पाळण्यात आला. मंगळवारी याबद्दलची माहिती सेलू पोलीस प्रशासनाला देण्यात आली होती. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सेलू शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या तालुक्याचे परंपरेनुसार शांततामय मार्गाने हा बंद सर्वांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. सेलूतील व्यापाऱ्यांनीही आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.
Latest Marathi News परभणी : सेलू शहर कडकडीत बंद; बाजारपेठेत शुकशुकाट Brought to You By : Bharat Live News Media.
