
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा ‘जगा चार दिवस’ हा आगामी मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. जागृती एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या ‘जगा चार दिवस’चे निर्माते मुकूंद महाले आणि जागृती राहुल मोरे आहेत. डॅा. शांताराम दादा सोनावणे आणि राहुल सोनावणे यांचे देवा चलचित्र आणि मयुरेश फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
‘मी तुला पाहिले, तू मला पहिले…’ या गाण्याच्या रेकॅार्डिंगने या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी परभणीचे माजी खासदार अॅड. तुकाराम रेंगेपाटील, निर्माते मुकूंद महाले, सहनिर्माते डॅा. शांताराम दादा सोनावणे, राहुल सोनावणे, दिग्दर्शक सरकार आर. पी., अभिनेते गुरू आनंद उपस्थित होते.
गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी ‘मी तुला पाहिले, तू मला पहिले…’ हे गाणं लिहिलं आहे. संगीतकार दिनेश अर्जुना यांनी स्वप्नील बांदोडकर आणि डॅा. नेहा राजपाल यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. या चित्रपटाच्या नायक-नायिकेच्या मनातील भावना व्यक्त करणारं हे अर्थपूर्ण रोमँटिक गाणं आहे.
सस्पेन्स हॅारर कॅामेडी फॅमिली एन्टरटेनर असलेल्या ‘जगा चार दिवस’चे दिग्दर्शक सरकार आर. पी. आहे. कथालेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटाची पटकथा व संवादलेखन मुकुंद महाले यांनी केलं आहे. गीतकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीत साज चढवला आहे. छायांकनाची जबाबदारी डीओपी एच. डी. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवम गौड या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
Latest Marathi News सस्पेन्स हॅारर कॅामेडी ‘जगा चार दिवस’ नवा चित्रपट येतोय Brought to You By : Bharat Live News Media.
