अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात अमरेंद्र मिश्राला न्यायालयीन कोठडी

मुंबई ः Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याची मंगळवारी न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या कटातून मिश्राला फायदा झाला आहे का, याचीही चौकशी करीत असल्याचे सांगून सुनावणी वेळी सरकारी वकिलांनी मिश्राच्या पोलीस कोठडीत वाढ मागितली. ( Abhishek Ghosalkar case )
संबंधित बातम्या
Abhishek Ghosalkar : माझ्या मुलीने बाप गमावला, तितकेच वाईट घोसाळकरांच्या मुलाचे वाटते; मॉरिसच्या पत्नीची भावना
Abhishek Ghosalkar Case : अभिषेकला विश्वासघाताने संपवले, आमची बदनामी थांबवा : विनोद घोसाळकर
Abhishek Ghosalkar Firing Case : घोसाळकर हत्याप्रकरणी मॉरिसचा बॉडीगार्ड अटकेत
आरोपीने सर्व माहिती पोलिसांना दिली असून पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद मिश्राच्या वतीने अॅड. शंभू झा यांनी केला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी लक्ष्मीकांत पाढेन यांनी मिश्राची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ( Abhishek Ghosalkar case )
Latest Marathi News अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात अमरेंद्र मिश्राला न्यायालयीन कोठडी Brought to You By : Bharat Live News Media.
