नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन

नाशिक, सिडको : Bharat Live News Media वृत्तसेवा – आज, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असून नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच १ दिवशीय बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे.
येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्या किंवा त्यांच्या तब्यतीला काही बरे वाईट झाले तर नविन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आशिष हिरे यांनी दिला आहे. तसेच याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल असेही ते म्हणाले. या ठिकाणी आंदोलनाला नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील, जितेंद्र पाटिल, योगेश पाटील, गोपी पगार, विशाल पगार, गौरव भदाने, हर्षद पाटिल, शुभम महाले, राहुल काकळीज, योगेश आहीरे, हरीश शेवाळे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
सोनिया गांधींचा राज्यसभेसाठी अर्ज; प्रियांका गांधी लोकसभा लढणार? रायबरेली किंवा अमेठीचा पर्याय
Shivani Baokar : ‘लागिरं झालं जी’ फेम शीतली आता ‘साधी माणसं’मध्ये! पहिला लूक समोर
कर्नाटकच्या गँगस्टरला पुण्यात बेड्या; तीन पिस्तुले, 25 काडतुसांसह अटक
Latest Marathi News नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात मराठा बांधवांचे बोंबाबोंब आंदोलन Brought to You By : Bharat Live News Media.
