सोनिया गांधींचा राज्यसभेसाठी अर्ज; प्रियांका गांधी लोकसभा लढणार?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत. सोनिया गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक लढवतील. त्यामुळे रायबरेली या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून प्रियांका गांधी लोकसभेची निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेली २५ वर्षं सोनिया गांधी राजकारणात आहेत. गांधी घराण्याचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या रायबरेलीचे त्या प्रतिनिधित्व करतात. काँग्रेसने राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. यात सोनिया गांधी या राजस्थानातून तर अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जही दाखल केला. त्या वेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी त्यांच्यासोबत होते.
प्रियंका गांधी लोकसभा लढवतील?
सोनिया गांधी यांनी पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने एकमेव जागेवर विजय मिळवला होता, हा मतदारसंघ म्हणजे रायबरेली होय. २०१९मध्येच सोनिया गांधी यांनी ‘ही शेवटची निवडणूक’ असल्याचे जाहीर केले होते. सोनिया गांधी आता राज्यसभेवर जात असल्याने त्या आता निवडणुकांच्या राजकारणातून दूर राहातील असे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकी प्रियांका गांधी रायबरेली किंवा अमेठी येथून निवडणूक लढवतील असे बोलले जाते.
हेही वाचा
Rajya Sabha Elections : राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी
राज्यसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ‘या’ नावांची चर्चा
Namaz Break in Rajya Sabha : आता राज्यसभेत नमाजासाठी ‘ब्रेक’ नाही; राज्यसभा सभापतींचा निर्णय
Latest Marathi News सोनिया गांधींचा राज्यसभेसाठी अर्ज; प्रियांका गांधी लोकसभा लढणार? Brought to You By : Bharat Live News Media.
