घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे असाच प्रकार सध्या फेसबुकवर नटराज कंपनीच्या नावाखाली लूटमार करण्याचा सुरू आहे. (Online Fraud ) फेसबुकवर एका नामांकित पेन्सिल बनविणाऱ्या कंपनीचे नाव टाकून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे नंबर टाकून नागरिकांना घरबसल्या रोजगाराच्या संधीचे आमिष दाखविले जात आहे, … The post घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच appeared first on पुढारी.

घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे असाच प्रकार सध्या फेसबुकवर नटराज कंपनीच्या नावाखाली लूटमार करण्याचा सुरू आहे. (Online Fraud )
फेसबुकवर एका नामांकित पेन्सिल बनविणाऱ्या कंपनीचे नाव टाकून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ दाखवून, वेगवेगळे नंबर टाकून नागरिकांना घरबसल्या रोजगाराच्या संधीचे आमिष दाखविले जात आहे, गरजू या नंबरवर सहज फोन करून विचारपूस करतात. त्यावेळी समोरची व्यक्ती त्यांच्या कंपन्यांचे गोडाऊन, मालाने भरलेल्या गाड्या, कंपनीचे पॅकिंगची पद्धत, तुम्हाला त्याद्वारे होणारा फायदा असे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हॉट्स ॲपच्या (Online Fraud ) माध्यमातून पाठवतो. ग्रामीण भागातील तरुण व विशेषतः महिला या आमिषाला बळी पडत आहे, व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असाल तर एक फोटो व आधारकार्ड व त्यासोबत ६२० रुपयांची मागणी केली जाते. दहा मिनिटांत आयडी कार्ड तयार करून पाठवले जाते व तुम्हाला २४ तासांच्या आत घरी माल पाठवला जाईल व त्या मालासोबत आपणास पंधरा हजार रुपये ॲडव्हान्स दिला जाईल व आपण तो माल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅकिंग करा व पुनश्च कंपनीला पाठवा, आपणास तीस हजार रुपये महिना मिळू शकतो, असेही सांगितले जाते.
फसिवले गेलेले नागरिक गप्पच
फसविले गेल्यानंतर गप्प बसल्याशिवाय संबंधितांकडे पर्याय नसतो. तेव्हा याबाबतचे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची कंपनी घरापर्यंत माल पाठवून पॅकिंग करून घेत नाही. नामांकित कंपनीच्या नावाखाली लुटण्याचा गोरखधंदा सुरू असल्याने राज्याच्या सायबर क्राइम सेलने या घटनांचा छडा लावावा आणि त्यासाठी नागरिकांनी तक्रारी दाखल करण्याची गरज आहे. अशा प्रकारचे अनेक गुन्हे सायबर सेलकडे दाखल होत आहे. मात्र, ग्राहकांनी कुठल्याही प्रकारे घरबसल्या कामासाठी मागे लागू नये. कुठल्याही प्रकारे पैसे पाठवू नये,असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.  (Online Fraud )
असा घातला जातो गंडा
कथित कंपनीकडून बोलत समोरच्या व्यक्तीकडून डिलिव्हरीसाठी गाडी आली असून घरापासून १८ ते २० किलोमीटरवर असल्याचे सांगितले जाते. आयडी लॉक झालेला आहे. तो खोलण्यासाठी जीपीएस चार्जेस २५५० अथवा ३१५० एवढी रकम ऑनलाइन मागितली जाते. पैसे पाठवताना दोन प्रकारच्या ट्रान्जॅक्शनमध्ये म्हणजेच एक २५०० व दुसरे पन्नास रुपये असे पाठवा किंवा ३१०० परत ५० असे पाठवा अन्यथा आपले पैसे कंपनीत लॉक झाले आहे, अशी बतावणी केली जाते अथवा पुन्हा पैशांची मागणी केली जाते. दोन प्रकारचे ट्रान्जंक्शन केलेले असूनही नागरिकांना पुन्हा कुठल्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाही अथवा मिळत नाही. पैसे उकळण्यासाठी आणखी पैसे पाठवाल तेव्हाच आपले पहिले पैसे मिळतील अथवा माल घेऊन आलेली गाडी रिटर्न जात आहे, असे सांगून फोन कट केला जातो. कधी कधी नंबरसुद्धा ब्लॉक केला जात असल्याचे प्रकार समोर आलेले आहे.
सावधान! पोलिसांचे आवाहन
अशा प्रकारचे अनेक गुन्हे सायबर सेलकडे दाखल होत आहे. मात्र, ग्राहकांनी कुठल्याही प्रकारे घरबसल्या कामासाठी मागे लागू नये कुठल्याही प्रकारे पैसे पाठवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही वाचा:

Nashik Fraud News | पार्ट टाइम जाॅबचे आमिष
भारतात 55 कोटी ऑनलाईन गेमर्स!
Nashik | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय

Latest Marathi News घटनांमध्ये वाढ होत असून फसिवले गेलेले नागरिक गप्पच Brought to You By : Bharat Live News Media.