सोनिया गांधींनी राजस्थानातून दाखल केला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आज (दि.१४) जयपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोनिया गांधी राज्यसभेवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या ५ वेळा लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत.यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा उपस्थित होते. Sonia Gandhi
सोनिया गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. यावेळी प्रियंका गांधी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांच्या जागेवरून सोनियांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजी पंतप्रधानांचा कार्यकाळ ३ एप्रिल २०२४ रोजी संपणार आहे. Sonia Gandhi
काँग्रेसने आमदारांना जयपूरमध्ये बोलावून घेतले आहे. १०-१० समर्थक आमदारांचे नामांकन सेट केले आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूरला पोहोचण्यास सांगितले आहे. सर्व आमदारांना दोन दिवस जयपूरमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.
Sonia Gandhi files nomination for Rajya Sabha elections from Rajasthan
Read @ANI Story | https://t.co/4pbJ4CyV3c#SoniaGandhi #RSPolls #Rajasthan pic.twitter.com/bWcPOaGWNH
— ANI Digital (@ani_digital) February 14, 2024
हेही वाचा
Ashok Shankarrao Chavan : अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण
काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाच्या हालचाली
Goa Politics : गोव्यामध्ये INDIA आघाडीत फूट; द. गोव्यात काँग्रेस खासदार असताना ‘आप’ने जाहीर केला उमेदवार
Latest Marathi News सोनिया गांधींनी राजस्थानातून दाखल केला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज Brought to You By : Bharat Live News Media.
