मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा : पुण्याच्या महिला, पुरुष संघांनी मारली बाजी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई महापालिका संघाने जवळजवळ जिंकलेला सामना शेवटच्या एका मिनिटात बाजी उलटवत सासवडच्या संत सोपान काका बँक संघाने जिंकत मुख्यमंत्री चषक पटकावला. पृथ्वीराज शिंदे याने जिगरबाज खेळ करत शेवटच्या मिनिटात गुणांची कमाई केल्याने सासवड संघास … The post  मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा : पुण्याच्या महिला, पुरुष संघांनी मारली बाजी appeared first on पुढारी.

 मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा : पुण्याच्या महिला, पुरुष संघांनी मारली बाजी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई महापालिका संघाने जवळजवळ जिंकलेला सामना शेवटच्या एका मिनिटात बाजी उलटवत सासवडच्या संत सोपान काका बँक संघाने जिंकत मुख्यमंत्री चषक पटकावला. पृथ्वीराज शिंदे याने जिगरबाज खेळ करत शेवटच्या मिनिटात गुणांची कमाई केल्याने सासवड संघास विजेतेपद मिळाले. त्याचवेळी महिलांमध्ये एकतर्फी अंतिम सामन्यात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकावले.

व्यावसायिक पुरुष गटाची फायनल अपेक्षेनुसार रोमहर्षक ठरली. दोन्ही संघांनी व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन करत खेळ करत गुण घेतल्याने प्रत्येक क्षणाला विजयाचे पारडे दोन्ही संघांकडे झुकत होते. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये संत सोपान काका संघाने गुणांची कमाई करत आघाडी घेतली. मात्र मुंबई महापालिका संघाने शांतपणे चाली करत बरोबरी साधली. पहिल्या हाफमध्ये सामना 19-19 असा बरोबरीत होता. दुसर्‍या हाफमध्ये ही दोन्ही संघ एकमेकांवर गुणांची कमाई करत होते. संत सोपान काका संघास काही चुकांचा फटका बसला. त्यामुळे हा संघ पिछाडीवर होता. शेवटच्या पाच मिनिटांत मुंबई संघ विजेतेपद पटकावणार असे वाटत असतानाच पुण्याच्या पृथ्वीराज शिंदेंने चपळदार खेळाने पुणे संघास गुण मिळवून दिले.

त्यांच्या जादुई हालचालींपुढे मुंबई संघाचा प्रतिकार कमी पडला आणि 40-45 अशा गुणांनी सासवड संघाने विजेतेपद पटकावले. त्यावेळी मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जल्लोष करत पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत थरार पाहावयास मिळाल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंचे कौतुक झाले.  मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई संघाने तिसरा आणि इन्कम टॅक्स पुणे संघाने चौथा क्रमांक पटकावला. अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईच्या विशाल कुमार, उत्कृष्ट चढाईसाठी पृथ्वीराज शिंदे तर उत्कृष्ट पकडसाठी राजेश बोराडे याला गौरवण्यात आले. महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्ती मुंबई संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद मिळविले. शिवशक्ती मुंबई संघास उपविजेतेपद, द्रोणा स्पोर्ट्स पुणे संघास तिसरा तर एम. डी. स्पोर्ट्स पुणे संघास चौथा क्रमांक मिळाला. अष्टपैलू खेळाडू म्हणून सलोनी गजमले, उत्कृष्ट चढाईसाठी अर्चना जोरे, उत्कृष्ट पकडसाठी रेखा सावंत यांना गौरवण्यात आले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष दिलीप गुरव,  वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव, माजी नगराध्यक्षा एड. विद्याराणी साळुंखे, रणजित नाना पाटील यांच्या हस्ते सामन्यांना प्रारंभ झाला. बक्षीस वितरण दिलीप गुरव, लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, एड. मानसिंगराव पाटील, रणजित नाना पाटील, सचिन पाटील, सचिव रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. मुनीर बागवान सावकार, विजय गरुड, दादासाहेब पाटील, एकनाथ बागडी, आशपाक मुजावर, किशोर शिंदे, विजय कुलकर्णी,  राजेंद्र जाधव, एकनाथ बागडी, लिबर्टीचे सर्व संचालक, आजी माजी खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लिबर्टी’ने अनुभवले गतवैभव
कबड्डीची मोठी परंपरा असणार्‍या लिबर्टी मजदूर मंडळाकडून रणजित पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. नामांकित खेळाडूंचा खेळ पहावयास मिळत आहे. शुक्रवारी अंतिम सामन्यासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लिबर्टीच्या मैदानावर पूर्वीचे दिवस पहावयास मिळत होते. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि नेटक्या संयोजनाबद्दल रणजित पाटील यांची अनेकांनी पाठ थोपटली. खास करून लिबर्टीचे माजी खेळाडूही भारावलेले होते.

हेही वाचा

कर्नाटकच्या गँगस्टरला पुण्यात बेड्या; तीन पिस्तुले, 25 काडतुसांसह अटक
NZ vs SA : द. आफ्रिका पहिल्या दिवसअखेर 6 बाद 220
इंदापुरातील तीन पोलिसांची मूळ ठिकाणी नियुक्ती

Latest Marathi News  मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा : पुण्याच्या महिला, पुरुष संघांनी मारली बाजी Brought to You By : Bharat Live News Media.