‘लागिरं झालं जी’ फेम शितली आता ‘साधी माणसं’मध्ये! पहिला लूक समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) नव्या रुपात दिसणार आहेत. स्टार प्रवाह नवी मालिका साधी माणसं घेऊन येत आहे. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच … The post ‘लागिरं झालं जी’ फेम शितली आता ‘साधी माणसं’मध्ये! पहिला लूक समोर appeared first on पुढारी.
‘लागिरं झालं जी’ फेम शितली आता ‘साधी माणसं’मध्ये! पहिला लूक समोर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) नव्या रुपात दिसणार आहेत. स्टार प्रवाह नवी मालिका साधी माणसं घेऊन येत आहे. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात राहत असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. (Shivani Baokar)

संबंधित बातम्या –

Prajaktta Mali : प्राजक्ता माळी नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची
‘जाऊ बाई गावात’ शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीचा मोठा निर्णय, २० लाख घेऊन…
Ae Watan Mere Watan : देशाची कहानी… ; ‘ऐ वतन मेरे वतन’ ओटीटीवर; सारा- इमरान हाश्मीचा कॅमियो

डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.

अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं आकाश म्हणाला.

 

View this post on Instagram

 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील.

 

View this post on Instagram

 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

View this post on Instagram

 
A post shared by Shivani Baokar (@shivanibaokar)

 

View this post on Instagram

 
A post shared by Akash Nalawade (@akash_nalawade_official)

 

View this post on Instagram

 
A post shared by Akash Nalawade (@akash_nalawade_official)

Latest Marathi News ‘लागिरं झालं जी’ फेम शितली आता ‘साधी माणसं’मध्ये! पहिला लूक समोर Brought to You By : Bharat Live News Media.