यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महापालिकेचे … The post यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! appeared first on पुढारी.

यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही!

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही कर व दरवाढ न करण्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी पाणीपट्टीत दुपटीहून अधिक दरवाढ करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या अंगलट आले होते. त्यानंतर आता अंदाजपत्रकात करांचे दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिकेचे २०२४ – २५ या आर्थिक वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक लवकरच स्थायी समिती, महासभेच्या मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. सद्यस्थितीत या अंदाजपत्रकाची आकडेमोड प्रशासनाकडून सुरू आहे. २८ फेब्रुवारीअखेर स्थायी समितीमार्फत अंदाजपत्रक मंजूर केल्यानंतर ३१ मार्चअखेरपर्यंत स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकाला महासभेची अंतिम मंजुरी घेतली जाणे बंधनकारक आहे. महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्यामुळे आयुक्त यांच्याकडेच प्रशासकपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे ते स्वतःच अंदाजपत्रकाला स्थायी समिती आणि महासभेसमोर मांडून अंतिम मंजुरी देणार आहेत.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी वगळता अन्य करांची समाधानकारक वसुली झालेली नाही. गेल्या वर्षी नगररचना विभागाने ऐनवेळी जोरदार भरारी घेत २४० कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला होता. मात्र, पाणीपट्टी वसुलीची अवस्था दयनीय होती, यंदा पाणीपट्टीसोबत नगररचना महसूल वसुलीची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे वाढता खर्च आणि घटते उत्पन्न याचा ताळमेळ साधण्यासाठी करवाढ केली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका कायद्यातील तरतुदींनुसार कर व दरांमध्ये वाढ लागू करण्यापूर्वी त्यासंदर्भातील प्रस्तावाला आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी २० फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीची मंजुरी मिळणे बंधनकारक आहे. ही मुदत संपण्यासाठी आता जेमतेम आठवडाच शिल्लक असून, करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर झालेला नाही. पाणीपुरवठा व मालमत्ताकर विभागाने करवाढीची शक्यता फेटाळली आहे. त्यामुळे यंदा नाशिककरांना करवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बीओटीतून महसूलवृध्दीचा पर्याय
महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक २,५५० कोटींवर जाण्याची शक्यता लेखा विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. घरपट्टी, पाणीपट्टीत करवाढ होणार नसली तरी बीओटीवर मिळकत विकासाच्या माध्यमातून ३०० कोटींचा अतिरिक्त महसूल मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आगामी अंदाजपत्रकात या योजनेचा समावेश असण्याची शक्यता आहे.

घरपट्टी वसुलीने यंदा उच्चांक गाठला असून, सर्वप्रथम थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. नाशिककरांवर कोणतीही करवाढ लादली जाणार नाही. – श्रीकांत पवार, उपायुक्त(कर)
पाणीपट्टी वसुलीसाठी वेगाने प्रयत्न केले जात असून, नळजोडणी खंडित करण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. यंदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली जाणार नाही. – संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता.

Latest Marathi News यंदा नाशिककरांवर कोणतीही करवाढ नाही! Brought to You By : Bharat Live News Media.