राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. (Rajya Sabha Elections)
काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच राज्यसभेसाठी उमेदवारी यादी जाहीर केली आहे, राजस्थान मधून सोनिया गांधी, बिहारमधून अखिलेश प्रसाद सिंह, हिमाचल प्रदेश मधून श्री अभिषेक मनु सिंघवी, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?
“भीम शक्ती” या आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत दामोदर हंडोरे यांना कॉंग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी घोषित केली आहे. हंडोरे हे महाराष्ट्र काँग्रेसचे सदस्य आहेत. ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक पदांची जबाबदारी स्विकारली आहे. 1992 ते 1993 या कालावधीत त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. 2014 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. तर 5 फेब्रुवारी 2021 रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2020 पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. चंद्रकांत हंडोरे २०२२ मध्ये राज्यात झालेल्या विधान परिषदेची निवडणुकमध्ये पराभूत झाले होते.
बातमी अपडेट होत आहे.
Congress releases a list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
Sonia Gandhi from Rajasthan
Abhishek Manu Singhvi from Himachal Pradesh pic.twitter.com/lXFCvMXgZp
— ANI (@ANI) February 14, 2024
Latest Marathi News राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी Brought to You By : Bharat Live News Media.
