पुणे : महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे 2700 अर्ज प्रलंबित
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या विविध चौदा शिष्यवृत्त्यांच्या पहिल्या आणि दुसर्या हप्त्यांसाठीचे 2 हजार 700 अर्ज महाविद्यालयांकडे छाननीसाठी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या अर्जांची तातडीने छाननी करून ते मंजूर करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडूनही महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षासाठी ‘महाडीबीटी’द्वारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या 2 हजार 700 विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर रखडले आहेत. हे अर्ज उच्च व तंत्रशिक्षण विभागाला मिळत नाहीत, तोपर्यंत शिष्यवृत्तीचे हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांनी या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील काही महाविद्यालयांकडे 2020-21 व 2021-22 या वर्षांचेही अर्ज प्रलंबित आहेत.
त्यांचीही तातडीने छाननी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे राज्य सरकारकडून विविध जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि जेवणाच्या खर्चासाठी 14 विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांद्वारे ऑनलाइन अर्ज करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयांकडून या अर्जांची छाननी करून हे अर्ज पुढे पाठवले जातात. या सर्व शिष्यवृत्त्या दोन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शिष्यवृत्तीच्या पहिल्या हप्त्यासाठी पुणे विभागात महाविद्यालयांकडून प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या 554 इतकी असून दुसर्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची संख्या 2 हजार 154 इतकी आहे. हे अर्ज अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे हप्ते वितरित होऊ शकलेले नाहीत.
हेही वाचा
कोल्हापूर : पाणी योजनांना मीटर न बसविल्यास दहापट दंड
सातारा : संघटना रस्त्यावर पण शेतकरी मात्र फडातच
जालन्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात बदली
The post पुणे : महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे 2700 अर्ज प्रलंबित appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या विविध चौदा शिष्यवृत्त्यांच्या पहिल्या आणि दुसर्या हप्त्यांसाठीचे 2 हजार 700 अर्ज महाविद्यालयांकडे छाननीसाठी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या अर्जांची तातडीने छाननी करून ते मंजूर करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडूनही महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक …
The post पुणे : महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे 2700 अर्ज प्रलंबित appeared first on पुढारी.