प्राजक्ता नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे.  (Prajaktta Mali) आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा … The post प्राजक्ता नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची appeared first on पुढारी.
प्राजक्ता नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे.  (Prajaktta Mali) आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम आवर्जून उपस्थित होती. (Prajaktta Mali)
संबंधित बातम्या –

‘जाऊ बाई गावात’ शो जिंकल्यानंतर रमशा फारुकीचा मोठा निर्णय, २० लाख घेऊन…
Ae Watan Mere Watan : देशाची कहानी… ; ‘ऐ वतन मेरे वतन’ ओटीटीवर; सारा- इमरान हाश्मीचा कॅमियो
Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका येतेय! विद्या बालनसोबत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री?

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओला कॅप्शन दिलीय-‘ह्या वर्षातील पुढील चित्रपटास प्रारंभ; काल पुण्यात मुहूर्त पार पडला.. 😌’

अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Latest Marathi News प्राजक्ता नव्या चित्रपटातून भेटीला, हटकी कथा “भिशी मित्र मंडळ”ची Brought to You By : Bharat Live News Media.