पुणे : शहरातील 356 रस्त्यांचा ‘वॉकिंग सर्व्हे’ पूर्ण!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या पथ विभागाकडून शहरातील 356 रस्त्यांचा ‘वॉकिंग सर्व्हे’ पूर्ण करण्यात आला आहे. यात रस्त्यांच्या स्थितीविषयी माहिती नोंदवण्यात आली आहे. त्रुटीची पूर्तता आणि दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी लवकरच पूर्वगणनपत्रक तयार करण्यात येणार असून ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत.
महापालिकेकडून शहरातील बारा मीटर रुंदीपेक्षा अधिक 378 रस्त्यांचा मवॉकिंग सर्व्हेफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘रॅम्पस’च्या माध्यमातून सर्व्हे केला जात आहे. यामध्ये रस्त्याच्या प्रत्येक दहा फुटाच्या अंतरावर फोटो काढले जात आहे. पथ विभागाच्या 41 कनिष्ठ अभियंत्यांकडून प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून तेथील अडचणींच्या नोंदी केल्या आहेत. त्यानुसार सिंहगड रोड-कात्रज परिसरातील 68, वानवडी – कोंढवा परिसर 39, मध्यवर्ती भाग 24, हडपसर- मुंढवा 64, नगर रस्ता-येरवडा 64, कोथरूड-कर्वेनगर 50 आणि औंध-बाणेर परिसरातील 47 रस्त्यांचे सर्वेक्षण झाले आहे. कनिष्ठ अभियंत्यांना पदपथ आणि वाहनांची वाहतूक होणार्या रस्त्यांची प्रत्यक्ष फिरून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार 356 रस्त्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. उर्वरित रस्त्यांचा सर्व्हे झाला असून, त्यांचा अहवाल लवकरच मिळेल, असे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
काय आढळले पाहणीत?
पदपथ सलग नसणे, त्यावरील ब्लॉक निघणे, ते वरखाली असणे तसेच पदपथांवर अतिक्रमणे, विजेच्या दिव्यांचे खांब, फिडर – पिलरचा अडथळा, झाडांच्या फांद्या, अशी स्थिती पदपथांची आहे. पावसाळी गटारे खचणे, त्याच्या जाळीचे लोखंडी बार वाकलेले, गटाराची झाकणे तुटणे, खोदाई झाल्यानंतर योग्य दुरुस्ती न करणे, खोदाई केल्यानंतर रस्ता खचणे अशी स्थिती रस्त्यांची आढळून आली आहे.
निकष पाळून गतिरोधकांची दुरुस्ती
पाहणी केलेल्या रस्त्यांवर एकूण 627 गतिरोधक आढळून आले आहेत. गतिरोधक उभारण्यासंदर्भात निकष आहे, या निकषांचे पालन न झालेले गतिरोधक काढले जाणार आहेत. जेथे गरज आहे, तेथे निकषानुसार त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. महापालिकेने 2022 साली गतिरोधकांचे धोरण ठरविले आहे. या धोरणानुसार पोलिसांची परवानगी असेल तरच ते तयार केले जाणार आसल्याचे दांडगे यांनी सांगितले.
हेही वाचा
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त शहरात प्रेमाचा बहर : प्रेमीयुगुलांमध्ये उत्साह
Nashik Fraud News | पार्ट टाइम जाॅबचे आमिष
Pune : मोक्कातील फरारींमुळे जामीनदारांची पंचाईत..
Latest Marathi News पुणे : शहरातील 356 रस्त्यांचा ‘वॉकिंग सर्व्हे’ पूर्ण! Brought to You By : Bharat Live News Media.
