कोल्हापूर : आंबा ते विशाळगड सूर्यास्तानंतर वाहतूक बंद

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आंबा विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक, प्रवासीवगनि या मार्गावरून रात्रीचा प्रवास करू नये, अन्य मार्गाचा वापर करावा. मानोली, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, आंबा या गावांसाठी मार्ग खुला राहील, अशी माहिती मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. (Kolhapur Amba-Vishalgad Road) आंबा-विशाळगड हा मार्ग सह्याद्रीच्या … The post कोल्हापूर : आंबा ते विशाळगड सूर्यास्तानंतर वाहतूक बंद appeared first on पुढारी.

कोल्हापूर : आंबा ते विशाळगड सूर्यास्तानंतर वाहतूक बंद

विशाळगड : Bharat Live News Media वृत्तसेवा : वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आंबा विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक, प्रवासीवगनि या मार्गावरून रात्रीचा प्रवास करू नये, अन्य मार्गाचा वापर करावा. मानोली, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, आंबा या गावांसाठी मार्ग खुला राहील, अशी माहिती मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. (Kolhapur Amba-Vishalgad Road)
आंबा-विशाळगड हा मार्ग सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जातो. राधानगरी आणि चांदोली अभयारण्यांना जोडणारा हा घनदाट वनराजीचा भाग आहे. विविध पक्षी, प्राणी, वनौषधी यांनी संपन्न जंगल असल्याने या मार्गावर जंगली पशू-पक्ष्यांचा वावर असतो. दुर्मीळ अशा जैविक जातीही येथे आढळतात. राज्य प्राणी शेखरू, गवा, लांडगा, कोल्हा, मोर, रानकोंबडे, मलबार पायबर पीठ, हॉर्नबिल यासारखे दुर्मीळ पक्षी-प्राण्यांच्या जाती येथे पाहावयास मिळतात. यांची सुरक्षितता तसेच निसर्ग सांभाळणारा प्रमुख घटक म्हणून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा मार्ग रात्रीचा बंद ठेवणे गरजेचे आहे. (Kolhapur Amba-Vishalgad Road)
मानोली येथील चेक पोस्ट येथे वन विभागाच्या वतीने प्रवाशांची तपासणी केली जाते. रात्रीची वाहतूक बंद केल्याने वनौषधींची तस्करी, चोरटी वृक्षतोड व गुन्हेगारीलाही पायबंद बसणार आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती मानोली, मानोली ग्राम व वन विभाग करत असलेली उपाययोजना म्हणून रस्ता रात्रीच्या वेळी बंद राहील, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले. (Kolhapur Amba-Vishalgad Road)
हेही वाचा : 

आदमापूर, गारगोटी, घाटकरवाडीत आंतरवाहिनी रस्ता
हृदयशस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिकीकरणासाठी 50 कोटी
व्हॅलेंटाईन डे विशेष : दैवे सांधिले जीवात्मे सारे, प्रेमस्नेहाच्या वातीने!

 
Latest Marathi News कोल्हापूर : आंबा ते विशाळगड सूर्यास्तानंतर वाहतूक बंद Brought to You By : Bharat Live News Media.