जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिली सलामी

नाशिक (माडसांगवी) : Bharat Live News Media वृत्तसेवा
आडगाव येथील सीआरपीएफ (आरएएफ) फोर्समधील हेड कॉन्स्टेबल जवान सचिन श्रीराम चव्हाण यांचे रविवारी (दि.११) रात्री राजधानी दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आडगाव येथील कोणार्कनगर येथील इच्छामणीनगरमधील ते रहिवासी होते. चव्हाण यांचे पार्थिवावर मंगळवारी सकाळी नांदूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना सलामी दिली. तसेच सीआरपीएफ फोर्समधील वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबीयांच्या वतीने चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. चव्हाण यांच्या पश्चात मुलगा, पत्नी, इतर परिवार आहे.
Latest Marathi News जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दिली सलामी Brought to You By : Bharat Live News Media.
