धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नऊ सदस्यांची अभ्यास समिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असतानाच आता राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या 9 सदस्यीय अभ्यास गटाच्या अध्यक्षस्थानी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची नियुक्ती … The post धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नऊ सदस्यांची अभ्यास समिती appeared first on पुढारी.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नऊ सदस्यांची अभ्यास समिती

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असतानाच आता राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या 9 सदस्यीय अभ्यास गटाच्या अध्यक्षस्थानी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हा अभ्यास गट मध्य प्रदेश, बिहार व तेलगंणा या राज्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये जाती-जमातींना जातप्रमाणपत्र तसेच अन्य लाभ देण्यासाठी अवलंबिलेल्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणार आहे. या राज्यांच्या भेटीनंतर योग्य कागदपत्रे व दस्तऐवजांसह तीन महिन्यांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.
धनगर समाजाला सध्या भटक्या विमुक्त जातीच्या ‘क’ या श्रेणीमधून साडेतीन टक्के आरक्षण आहे. मात्र, आम्हाला अनुसूचित जमातीतून आरक्षण मिळावे, अशी धनगर समाजाची मागणी आहे. केंद्र सरकारच्या सूचीमध्ये ‘धनगड’ नावाच्या जातीला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, ‘धनगड’ आणि ‘धनगर’ या शब्दावरून सध्या महाराष्ट्रातील धनगर आरक्षण रखडले आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यात ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट अंगावर भंडारा उधळला होता. धनगर आरक्षणाबाबत सरकारकडून दिरंगाई होत असून, आमच्याही भावनांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देत धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही तातडीने बैठक घेण्याचीही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर सह्याद्री अतिथीगृहात 21 सप्टेंबर रोजी बैठक बोलावली होती. यशवंत सेनेचेही राज्यभर आंदोलन सुरू आहे.
या समितीमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहसचिव दे. आ. गावडे (सदस्य सचिव व समन्वयक), महसूल विभागाचे उपसचिव संतोष गावडे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक धनंजय सावळकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांचे विशेष कार्य अधिकारी जगन्नाथ वीरकर या सरकारी अधिकार्‍यांबरोबरच अशासकीय सदस्य म्हणून यशवंत सेनेचे अध्यक्ष माणिकराव दांडगे पाटील, जे. पी. बघेळ, एम. ए. पाचपोळ, इंजिनिअर जी. बी. नरवटे यांचा समावेश केला आहे.

The post धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नऊ सदस्यांची अभ्यास समिती appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असतानाच आता राज्य सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या 9 सदस्यीय अभ्यास गटाच्या अध्यक्षस्थानी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची नियुक्ती …

The post धनगर समाजाच्या आरक्षणासाठी नऊ सदस्यांची अभ्यास समिती appeared first on पुढारी.

Go to Source