जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : श्रीगणेश म्हणतात की, आजतुमचे उत्पन्नाचे साधन सुधारेल. आर्थिक घडामोडी सुधारतील. कोणतीही योजना बनवण्यात घाई करू नका. भावनेच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेणे हानिकारक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगला आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने तुमची आत्मबल कायम राहील.
वृषभ : आज तुमचे संपूर्ण लक्ष आर्थिक बाबींवर असेल. घरा संबंधित कामांनाही प्राधान्य असेल. वास्तूचे नियम पाळल्यास योग्य फळ मिळेल. पैसे उधार देताना काळजी घ्या. तुम्ही कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. प्रकृती चांगली राहिल, असे श्रीगणेश सांगतात.
मिथुन : आज तुम्ही विश्रांती आणि कलात्मक गोष्टींसाठी वेळ घालवाल. कलागुणांचा वापर करून तुम्ही स्वतःला पुन्हा उत्साही कराल. नकारात्मक विचारांना लांब ठेवा. नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्याची गरज आहे. भागीदारीशी संबंधित कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. ध्यान आणि योगासनांकडे अधिक लक्ष द्या.
कर्क : आज तुम्ही स्वतःमध्ये आत्मविश्वास अनुभवाल. मित्रांसोबत फिरण्यात आणि मनोरंजनात्मक उपक्रम करण्यात वेळ जाईल. चुकीच्या कामात खर्च वाढेल. मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते. मुलांबद्दल काही गोष्टींबद्दल मनात चिंता राहील. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांवर तुमचा भर राहील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्ला श्रीगणेश देतात.
सिंह : आज ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्यासाठी अनुकूल आहे. मात्र तुमचा अहंकार आणि अतिआत्मविश्वास तुम्हाला समाजापासून वेगळे करेल, असे श्रीगणेश सांगतात. मुलाच्या क्रियाकलाप आणि संगतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आज कोणत्याही व्यक्तीशी भागीदारी करू नका. जोडीदारासोबत काही तणाव असू शकतो. सांधेदुखीची समस्या असू शकते.
कन्या : आज तुमचा बराचसा वेळ बाहेरच्या कामांमध्ये जाईल, असे श्रीगणेश सांगतात. काही नवीन लोकांशी संपर्कही प्रस्थापित होईल. धार्मिक नियोजनासाठी जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाण्याची संधी मिळेल. खोट्या मैत्रीपासून दूर राहा, यामुळे नुकसानाशिवाय काहीही होणार नाही. मुलावर जास्त नियंत्रण ठेवू नका. कौटुंबिक व्यवसायात प्रगती होऊ शकते. कौटुंबिक सुव्यवस्था राखण्यासाठी जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पोटाच्या विकाराकडे दुर्लक्ष करु नका.
तूळ : श्रीगणेश म्हणतात की, तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल, यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे संपूर्ण लक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर असेल. मात्र तरुणांनी कोणताही चुकीचा मार्गाचा वापर क़रु नका. सध्याच्या व्यवसायाशी संबंधित काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल विचार करा. जोडीदाराची साथ तुम्हाला अनेक कामात मदत करेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही नियोजित कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. भूतकाळाशी संबंधित कोणतीही समस्या पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे तणाव वाढणार आहे. घरातील मोठ्यांच्या सहकार्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. स्वच्छता राखणे आवश्यक आहे.
धनु : श्रीगणेश म्हणतात की, तुमचा आदर्शवादी स्वभाव समाजात तुमचा आदर राखेल. मुलाच्या नकारात्मक प्रभावामुळे आणि क्रियाकलापांमुळे त्रास होऊ शकतो. व्यावसायिक कामे व्यवस्थित होतील. तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडून जास्त अपेक्षा करत असाल तर तुमच्यासाठी काही त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा संसर्गपासून जपा.
मकर : श्रीगणेश सांगतात की, प्रत्येक काम करण्याआधी त्याबद्दल नियोजनबद्ध पद्धतीने विचार करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना शुभ सूचना प्राप्त होतील. अतिविचारांमुळे महत्त्वाची कामे प्रलंबित राहतील. घरामध्ये एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित बदलाच्या प्रयत्न करत राहा. घरातील समस्यांवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात.
कुंभ : दैनंदिन कामांचा कंटाळा आल्यावर तुम्ही तुमच्या कलात्मक आणि क्रीडाविषयक आवडींमध्ये वेळ घालवाल, असे
श्रीगणेश सांगतात. घराच्या व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. कामात व्यस्त असल्यामुळे पती-पत्नी दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकणार नाहीत. खोकला, ताप आणि घसादुखीचा त्रास होण्याची शक्यता.
मीन : श्रीगणेश म्हणतात की , आज कर्मावर विश्वास ठेवल्याने तुम्हाला यश मिळेल.उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होतील.रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. नातेवाईकांशी नाते बिघडणार नाही याची काळजी घ्या सार्वजनिक व्यवहार आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. पित्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.
