जागतिक बँकेची समिती आज कोल्हापुरात

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापुरातील महापुरासंदर्भात जागतिक बँकेची समिती बुधवारी (दि. 14) कोल्हापूर दौर्यावर येत आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी समितीचे सदस्य पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात बैठक होणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या सदस्यांची समिती कोल्हापूर दौर्यावर येत आहे. हा प्रकल्प मित्र संस्थेच्या माध्यमातून राबविला जात असून मित्र संस्थेचे उपाध्यक्ष क्षीरसागर आहेत. संबंधित प्रशासकीय अधिकारी व जागतिक बँकेच्या समितीचा दौरा असा : बुधवारी दुपारी 1.30 ते 2 पर्यंत प्रयाग चिखली, दुपारी 2 ते 2.30 पर्यंत गायमुख जोतिबा येथे भेट, दुपारी 3.30 वा. दुधाळी येथे भेट, दुपारी 4 वा. राजाराम बंधारा.
Latest Marathi News जागतिक बँकेची समिती आज कोल्हापुरात Brought to You By : Bharat Live News Media.
