सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आज (दि. १४) राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी राज्यसभेसाठी ऑफर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते. सोनिया गांधी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल … The post सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार  appeared first on पुढारी.

सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार 

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आज (दि. १४) राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी राज्यसभेसाठी ऑफर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी ही ऑफर नाकारल्याचे समजते.

सोनिया गांधी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. दरम्यान,आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन दशकांहून अधिक काळ सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होत्या. तसेच त्या पाच वेळा लोकसभेवरही निवडून आल्या आहेत.

तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यातील काँग्रेसने सोनिया गांधी आपल्या राज्यातून राज्यसभेवर जाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

देशात १५ राज्यांतील ५६ जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. २७  फेब्रुवारीलाच मतदान होणार असून निकाल देखील त्याच दिवशी येणार आहे.
Latest Marathi News सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार  Brought to You By : Bharat Live News Media.