माझ्या रक्तारक्तामध्ये काँग्रेस : आमदार सुभाष धोटे

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. १३) काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यांच्या सोबत राज्यातील 17 आमदार राजीनामा देणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांचेही नाव समोर आले. यावर प्रतिक्रया देताना आमदार धोटे यांनी, मी काँग्रेस सोडण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. माझ्या रक्तारक्तामध्ये काँग्रेस आहे, अशी प्रतिक्रीया देऊन आमदार सुभाष धोटे यांनी, पक्ष सोडण्याच्या अफवांवर पूर्ण विराम दिला आहे.
सध्या राज्यात एकापक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे राजकीय नेत्याचे जोरदार सत्र सुरू आहे. काँग्रेस पक्षातून बडे नेते भाजपामध्ये सामील होतील असा दावाही राजकीय नेते करीत असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांनंतर आज मंगळवारी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यांनतर त्यांच्या सोबत राज्यातील सुमारे सतरा आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू झाल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना आज मंगळवारी त्यांनी या बाबत प्रतिक्रिया दिली. मी काँग्रेस सोडणार असल्याची ही माहिती चुकीची आहे. काँग्रेस सोडण्याचे मी स्वप्नातही विचार करणार नाही. माझ्या मतदारसंघात, कुटूंबात व रक्तारक्तामध्ये काँग्रेस भिनला असल्याचे धोटे यांनी सांगितले. मी माझ्या मतदार संघात दुसऱ्यांदा काँग्रेसचा आमदार झालो आहो. काँग्रेसचा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष आहो. त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा विचार माझ्यात मनात येत नाही.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याचे कारण मला माहित नाही,परंतु त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. त्यांना शुभेच्छा देत त्यांनी स्वत: पक्ष सोडण्याच्या सुरू असलेल्या चर्चा ह्या वावड्या असल्याचे म्हटले आहे. मिडीयामध्ये छापून आलेली माहिती ही अत्यंत चूकीची आहे. मी पक्षाचा बुथलेवला काम करणारा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपला मतदार संघ, जिल्ह्यातील नागरिकांना, आपण काँग्रेसचा सच्चा शिपाई असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी व आताचे नेते राहुल गांधी आणि देशाचे काँग्रसचे अध्यक्ष खर्गे तसेच राज्याचे नेते नाना पटोले, विजय वड्डेटीवार यांच्या विश्वासावर काम करीत आहो. त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा विषय येऊच शक्त नाही. मी कधी काँग्रेस सोडली नाही आणि सोडणार नाही असे स्पष्ट करून पक्ष सोडण्याच्या वावड्यांना पूर्ण विराम लावला आहे.
Latest Marathi News माझ्या रक्तारक्तामध्ये काँग्रेस : आमदार सुभाष धोटे Brought to You By : Bharat Live News Media.
