शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गोव्यात विविध कार्यक्रम

पणजी :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गोवा पर्यटन खात्यातर्फे राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्य कार्यक्रम डिचोली येथे होणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज (दि.१३ ) पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकात शेट्ये व मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित … The post शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गोव्यात विविध कार्यक्रम appeared first on पुढारी.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गोव्यात विविध कार्यक्रम

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी :  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त गोवा पर्यटन खात्यातर्फे राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्य कार्यक्रम डिचोली येथे होणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज (दि.१३ ) पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकात शेट्ये व मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित होते.
पर्यटन खाते पर्यटनासोबतच गोव्याच्या सण- उत्सवांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी देत आहे. गोव्याची संस्कृती जतनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले. त्यांचा पराक्रम, त्यांचे संस्कार आणि देशप्रेम तरूणांमध्ये यावे व गोव्यातील तमाम लोकांना आणि पर्यटकानांही शिवरायांच्या कार्याची माहिती कळावी, यासाठी यंदा शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होत असल्याने डिचोली येथे १८ व १९ फेब्रुवारीला भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे खंवटे यांनी सांगितले.
१८ व १९ फेब्रुवारी रोजी पर्वरी येथील शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात शिवकालीन शस्त्रे व नाण्याचे प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. १९ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता शिक्षण संचालनाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
तसेच डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १८ फेब्रुवारीला अ.गो वेशभूषा, किल्ले तयार करणे व फुगडी स्पर्धा होणार आहे. रात्री डिचोली व मये मतदारसंघातील प्रत्येकी दहा शिवप्रेमींचा गौरव होणार आहे. १९ फेब्रुवारीला डिचोली ते सप्टकोटेश्वर नार्वे अशी मिरवणूक सकाळी होईल. सप्टकोटेश्वराला अभिषेक होईल. डिचोली येथील दोन्ही शिवपुतळ्याचे पूजन होईल. त्यानंतर संध्याकाळी मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खंवटे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार डॉ. शेट्ये यांनी दिली.
पाच ठिकाणी कार्यक्रम
१९ फेब्रुवारीला फर्मागुढी येथे दरवर्षी होणारा राज्यस्तरीय शिवजयंती कार्यक्रम होणार आहेच. पण त्यासोबत पर्यटन खात्याने डिचोली येथे मुख्य कार्यक्रमासह पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव व फोंडा येथे पालिकेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच पालिकांना त्यासाठी प्रत्येकी ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. अशी माहिती रोहण खंवटे यांनी दिली.
हेही वाचा :

Farmers Protest Delhi : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत बंदोबस्त वाढला, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद
राजधानीत ‘तो राजहंस एक’ नाट्य कलाकृतीचा प्रयोग; शेतकरी तरुणाच्या लग्नाचा उलगडणार जीवनप्रवास
Alaskapox | कोव्हिडनंतर अलास्कापॉक्सचे संकट! अलास्कात दुर्मिळ व्हायरसमुळे एकाचा मृत्यू

Latest Marathi News शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून गोव्यात विविध कार्यक्रम Brought to You By : Bharat Live News Media.