माझा जीव गेला तर महाराष्ट्र दुसरी श्रीलंका होणार : जरांगे पाटील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषमासाठी बसले आहेत. १० तारखेपासून त्यांनी अन्नत्याग केला आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची देखील माहिती आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावण्यात येणार होते. पण १५ तारखेचं अधिवेशन २० तारखेला घेण्यात येणार आहे. असे सांगत सरकार दुर्लक्ष करत आहे का असा सवाल उपस्थित केला. मराठ्यासांठी जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या भुमिकेवर ठाम असल्याचे जरांगे पाटील सांगितले. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
चौथ्या दिवशीही जरांगे पाटील यांचा उपचारासाठी नकार
उपोषणाच्या चौथ्या दिवशीही जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला. आज (दि. १३) सकाळी जालना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वाखालील पथक मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी आले होते. या डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांच्याकडे आरोग्य तपासणीसाठी आग्रह केला. पाटील तपासणी करू द्या, उपचार घेवू नका पण तपासणी तरी करू द्यावी अशी विनंती केली. मात्र आधी सरकारला सगे सोयरे कायदा करा, त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाकडे केली. त्यानंतर हे डॉक्टरांचं पथक माघारी फिरले.
हेही वाचा
Manoj Jarange Patil : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
Manoj Jarange Patil : ओबीसीतून आरक्षण दिले तरच उपोषण थांबविणार : मनोज जरांगे-पाटील
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची अवस्था पाहून महिलांना अश्रू अनावर; पाणी पिण्याची विनंती
Latest Marathi News माझा जीव गेला तर महाराष्ट्र दुसरी श्रीलंका होणार : जरांगे पाटील Brought to You By : Bharat Live News Media.
