नागपूर: संसारासाठी चोरी, नवदाम्पत्याची एटीएममधून पैसे चोरण्याची क्लृप्ती उघड

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : बेरोजगार प्रियकर आणि प्रेयसीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरवले. मात्र, लग्न करून संसार सुरू करण्यासाठी जवळ पैसा नव्हता. म्हणून त्यांनी थेट एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमवण्याचा धंदा सुरू केला. मात्र, गणेशपेठ लकडगंज व तहसील आणि अजनीतील काही एटीएममधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
आदिल राजू खान व प्रियंका सतवीर सिंग (दोघे रा. उत्तर प्रदेश) असे संशय़ित आरोपीचे नावे आहेत. आरोपींनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरला लोखंडी पट्टी लावून त्यास ट्रेस करून २ हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा मॅनेजर यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर परिसरात शोध घेतला असता दोन्ही आरोपी अडकले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
हेही वाचा
नागपूर: टेकडीच्या बाप्पाला ११०० किलोच्या लाडूचा प्रसाद
नागपूर: प्रेम प्रकरणातून मारहाण करणाऱ्या एकाला अटक
नागपूर : आठवडाभरात ७ हत्यांनी उपराजधानी हादरली
Latest Marathi News नागपूर: संसारासाठी चोरी, नवदाम्पत्याची एटीएममधून पैसे चोरण्याची क्लृप्ती उघड Brought to You By : Bharat Live News Media.
