Jalgaon : तब्बल 11 ट्रकमध्ये भरलेला रंगयुक्त सुपारीचा साठा जप्त

जळगांव : Bharat Live News Media वृत्तसेवा; मुक्ताईनगर तालुक्यातील हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व-हाणे शिवारात 11 ट्रकमध्ये किड लागलेली सुपारी आणि ती लपविण्यासाठी रंग लावलेल्या भेसळयुक्त सुपारीचा सुमारे २५२ टन साठा जप्त करण्यात आला आहे. सुपारीचे एकूण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून उर्वरित २५२.३ टन, किंमत रुपये ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की मालेगाव मनमाड रोडवरून कर्नाटकातून दिल्लीला रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक ट्रकमधून होत आहे. या माहितीच्या आधारे अविनाश दाभाडे यांनी हॉटेल हरयाणा मेवात ढाबा व-हाणे शिवार येथे छापा मारला. छाप्यात रंग लावलेली सुपारीची अवैध वाहतूक करणारे तब्बल ११ ट्रक हॉटेलच्या मागे लपवून ठेवण्यात आले होते. सर्व वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये किटकांच्या प्रादुर्भावाने खराब झालेली आणि ती लपविण्यासाठी रंग लावलेली भेसळयुक्त सुपारीचा सुमारे २५२ टन साठा आढळून आला.
यांनी केली कारवाई
नाशिक कार्यालयाचे पथक नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांच्या नियंत्रणाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांच्या उपस्थिती मध्ये अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), प्रमोद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी, योगेश देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी, गोपाळ कासार, अन्न सुरक्षा अधिकारी, अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी, तसेच महिल अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन आणि सायली पटवर्धन, सचिन झुरडे हे पथक घटनास्थळी दाखल झाले.
११ नमुने विश्लेषणासाठी
सुपारीचे एकुण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येवून उर्वरीत २५२.३टन किंमत रुपये ३ कोटी ८४ लाख १९ हजार ९८३ इतक्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. सदरचे नमुने विश्लेशणासाठी पाठविण्यात आलेले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाचे अविनाश दाभाडे, अन्न् सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता यांचे मार्फत करण्यात येत आहे.
हेही वाचा :
Chalo Delhi March: ‘चलो दिल्ली मार्च’ अंतर्गत पंजाब- हरियाणा सीमेवर शेतकरी आक्रमक
Vijay Wadettiwar : माझ्याबाबत वावड्या पसरविल्या जात आहेत: विजय वडेट्टीवार
मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला सक्तमजुरी
Latest Marathi News Jalgaon : तब्बल 11 ट्रकमध्ये भरलेला रंगयुक्त सुपारीचा साठा जप्त Brought to You By : Bharat Live News Media.
