जनावरांना जगायला चारा मिळेल का चारा?

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्याचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला. तालुक्यात पाण्याअभावी हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाल्याने चार्याचा मोठा प्रश्न निमार्ण झाला आहे. आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकर्‍यांची शोधाशोध … The post जनावरांना जगायला चारा मिळेल का चारा? appeared first on पुढारी.

जनावरांना जगायला चारा मिळेल का चारा?

वाल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्याचा परिणाम खरीप व रब्बी हंगामावर झाला. तालुक्यात पाण्याअभावी हिरवा चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके जळून खाक झाल्याने चार्याचा मोठा प्रश्न निमार्ण झाला आहे. आगामी काळात जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतकर्‍यांची शोधाशोध सुरू झाली आहे.  दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि दुधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सद्यःस्थितीत बाहेरील तालुक्यातून चारा विकत आणून,  पशुधन वाचवण्यासाठी पशुपालक धडपडत आहेत.

पावसाने यंदा दडी मारल्याने नद्या-नाले, ओढे, तलाव, बंधारे, विहिरींनाही पाणी आले नाही. परिणामी, पिकांना पाणी देता न आल्याने शेतातील पिके जळून खाक झाली. खरीप हंगामातील पिकांपासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु केलेला खर्चही निघाला नाही. रब्बी हंगामात विहिरींची पाणी पातळी कमालीची खालावल्याने ज्वारी, मका, घास आदी पिके करपून गेल्याने चाराटंचाई निमार्ण झाली आहे.
पशुपालक नातेवाईकांकडे चा-यांची शोधाशोध करीत आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे जनावरे जागविण्यासाठी चारा म्हणून जनावरांना ऊस देण्यात येत आहे.

अनेक पशुपालक शेजारील दौंड, बारामती, पुरंदर व भोर तालुक्याच्या सीमेवरील काही गावात  तसेच पुणे- सातारा जिल्ह्यातील सीमेवरील गावातील नातेवाइकांकडे चारा मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मिळेल त्या किंमतीत चारा जमा करण्यासाठीची लगबग सुरू आहे. वाहतूक खर्च बघता पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत एक ट्रॉली चारा उपलब्ध होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामात जनावरांना चारा मिळाला नाही. जनावरांसाठी, दुसर्‍या तालुक्यातील गावाहून चारा विकत घेण्याची वेळ आली आहे. 
                                                                                            – तानाजी पवार,  पशुपालक.

या वर्षी जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्न  निर्माण झाला आहे. तत्परतेने चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. अन्यथा पशुधन विक्रीस काढण्याशिवाय पशुपालकास पर्याय उरणार नाही.
                                                                                                        -अरविंद पवार,  पशुपालक .

Latest Marathi News जनावरांना जगायला चारा मिळेल का चारा? Brought to You By : Bharat Live News Media.