पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अबु धाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (दि.१३) अबुधाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आलिंगन देऊन त्‍यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ( PM Modi arrives in Abu Dhabi ) घरी आल्‍यासारखंच वाटतं… माझ्या आणि माझ्या टीमच्या … The post पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अबु धाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत appeared first on पुढारी.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अबु धाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (दि.१३) अबुधाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आलिंगन देऊन त्‍यांचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ( PM Modi arrives in Abu Dhabi )
घरी आल्‍यासारखंच वाटतं…
माझ्या आणि माझ्या टीमच्या भव्य स्वागताबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी जेव्हाही येथे आलो तेव्हा मला असे वाटते की मी माझ्या घरी आणि कुटुंबाकडे आलो आहे. गेल्या सात वर्षांमध्‍ये आम्ही पाच वेळा भेटलो आहोत. प्रत्येक क्षेत्रात भारत आणि UAE मध्ये परस्पर भागीदारी आहे, असे PM मोदी यांनी द्विपक्षीय बैठकीच्या उद्घाटनाच्या भाषणावेळी नमूद केले.

VIDEO | “I thank you for this grand welcome of me and my team. As you said, I feel that whenever I have come here, I have always felt that I have come to my home and family. We have met five times in the last seven months. Today, there is mutual partnership between India and UAE… pic.twitter.com/fdx2CtyOVp
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2024

पंतप्रधान मोदी करणार मंदिराचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी १४ फेब्रुवारी रोजी अबुधाबीमध्ये ‘बीएपीएस’ हिंदू मंदिराचे उद्घाटन करतील. आज ( दि. 13 ) ते अबुधाबीच्या झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियममध्ये भारतीय प्रवासींना संबोधित करणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला अहलान मोदी (हॅलो मोदी) असे नाव देण्यात आले आहे. 2015 पासून पीएम मोदींचा यूएईचा हा सातवा दौरा आहे. गेल्या आठ महिन्यांतील त्यांचा हा तिसरा यूएई दौरा ठरला आहे. (PM Modi arrives in Abu Dhabi)

PM Modi arrives in Abu Dhabi to rousing welcome; to address ‘Ahlan Modi’ event today
Read @ANI Story | https://t.co/2QoQkI1qLD#AhlanModi #AbuDhabi #PMModi #UAE pic.twitter.com/uady9N1grI
— ANI Digital (@ani_digital) February 13, 2024

मोदींच्‍या हस्‍ते UPI चे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष अल नाह्यान यांच्यासह UPI आणि RuPayचे अनावरण केले. मोदींनी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्‍यासह रुपे आणि यूपीआयद्वारे पेमेंटही यावेळी केले.

VIDEO | PM Modi and UAE President Sheikh Mohammed Bin Zayed Al Nahyan introduce UPI service in Abu Dhabi. pic.twitter.com/24JKrjD77I
— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2024

आज अबुधाबीमध्ये प्रवासी हिंदूंना संबोधित करण्यापूर्वी PM मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली. यामध्‍ये त्‍यांनी म्‍हटले आहे की, पजगाशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे. आज संध्याकाळी, मी अहलान मोदी कार्यक्रमात UAE मधील भारतीय प्रवासींना भेटण्यास उत्सुक आहे. या अविस्मरणीय क्षणात नक्की सहभागी व्हा. 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटनापूर्वी सोशल मीडियावर BAPS हिंदू मंदिराची एक झलक दाखवण्यात आली आहे.

Over the next two days, I will be visiting UAE and Qatar to attend various programmes, which will deepen India’s bilateral relations with these nations.
My visit to UAE will be my seventh since assuming office, indicating the priority we attach to strong India-UAE friendship. I…
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2024

 
Latest Marathi News पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अबु धाबीमध्‍ये भव्‍य स्‍वागत Brought to You By : Bharat Live News Media.