गायी चोरणारे तिघे जेरबंद ; जेजुरी पोलिसांची कारवाई

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  जेजुरी (ता. जुन्नर) परिसरातील शिवरी येथून एका शेतकर्‍याच्या गोठ्यातून दोन जर्शी गायींची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी बारामती, फलटण येथून तिघा चोरट्यांना जेरबंद केले. तसेच चोरट्यांनी चोरी केलेल्या गायी देखील ताब्यात घेतल्या. सागर अशोक गोलांडे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. बारामती), रवींद्र ठकसेन रायते … The post गायी चोरणारे तिघे जेरबंद ; जेजुरी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

गायी चोरणारे तिघे जेरबंद ; जेजुरी पोलिसांची कारवाई

जेजुरी : Bharat Live News Media वृत्तसेवा :  जेजुरी (ता. जुन्नर) परिसरातील शिवरी येथून एका शेतकर्‍याच्या गोठ्यातून दोन जर्शी गायींची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी बारामती, फलटण येथून तिघा चोरट्यांना जेरबंद केले. तसेच चोरट्यांनी चोरी केलेल्या गायी देखील ताब्यात घेतल्या. सागर अशोक गोलांडे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. बारामती), रवींद्र ठकसेन रायते (वय 29, रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) आणि गणेश शंकर भोसले (वय 24, रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरी येथील शेतकरी प्रशांत शंकर लिंभोरे यांच्या गोठ्यातून दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी प्रत्येकी 68 हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याबाबत त्यांनी जेजुरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी पथकामार्फत शोध सुरू केला.
चोरीला गेलेल्या एका गायीच्या कानातील अनुदान बिल्ला ट्रान्स्फर यावरून जेजुरी पोलिसांनी सागर गलांडेस ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गायी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या आणखी दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या चोरट्यांनी मठाचीवाडी आणि साठेवाडी (ता. फलटण) येथे दोन्ही गायींची विक्री केली होती. या विक्री केलेल्या दोन्ही गायी ताब्यात घेऊन संबंधित शेतकर्‍यांना देण्यात आल्या. आरोपींनी वापरलेली पिकअप जीप (एमएच 12 एव्ही 4046) जप्त केली. ही कामगिरी सहायक फौजदार चंद्रकांत झेंडे, शुभम भोसले, पोलिस हवालदार तात्यासाहेब खाडे, शशिकांत लोंढे, पोलिस मित्र बापूसाहेब भोर, नाना घोगरे, संदीप राजपुरे, पशुवैद्यकीय अधिकारी विशाल लिंभोरे आदींच्या पथकाने केली.
बैलगाडा शर्यतीवेळी करीत होते रेकी
जेरबंद केलेले चोरटे बैलगाड्या शर्यतीवेळी ठिकठिकाणी जाऊन गोठ्यातील जनावरांची रेकी करून रात्रीच्या वेळी चोरी करत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. आरोपींना सासवड न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी सांगितले.
Latest Marathi News गायी चोरणारे तिघे जेरबंद ; जेजुरी पोलिसांची कारवाई Brought to You By : Bharat Live News Media.